Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

Pune Crime News : नमाज पठणासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार

Pune Crime News : पोलिसांनीच्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांचा भाचा नमाज पठणासाठी का जात नाही याबाबत बहिणीला विचारलं, आणि त्यानंतर... 

Pune Crime News : नमाज पठणासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार

Pune Crime News : शुक्रवारी पुण्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आणि अनेकांच्याच पायाखालची जमीन सरकली. इथं मशिदीमध्ये नमाज पठणासाठी गेलेल्या एका अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मशिदीच्याच करमचाऱ्यानं हे दुष्कृत्य केल्याची बाब इथं उघड झाली. पोलिसांत दाखल करण्यात आलेल्या FIR मधील माहितीनुसार 10 नोव्हेंबर रोजी ही घटना घडली. संबंधीत मुलाच्या मामाने याबाबत पोलीस ठाण्यात तकार दिल्यानंतर सर्व प्रकार उघडकीस आला.

मौहम्मद युसुफ असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या त्या कर्मचाऱ्याचं नाव असून, या आरोपीवर पोक्सो अंतर्गत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलाच्या मामाने सारा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी याबाबत बुधवारी फिर्याद दिली.

पोलिसांनीच्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांचा भाचा नमाज पठणासाठी का जात नाही याबाबत बहिणीला विचारलं. त्यावेळी हा  प्रकार समोर आला. नऊ वर्षीय पीडित मुलहा 10 नोव्हेंबर रोजी  उस्मानिया मस्जिद येथे त्याच्या मित्रासह नमाज पठणसाठी गेला होता. नमाज पठण झाल्यानंतरही तो तिथंच थांबला होता. 

पीडित तिथं थांबला असतानाच आरोपी तिथं आला आणि त्यानं पीडित अल्पवयीन मुलासह त्याच्या मित्राला तो मस्जिदीत रहात असलेल्या खोलीत नेलं. नमाज पठणाविषयी त्यानं या मुलांना थोडी माहिती दिली आणि त्यानंतर पीडिताच्या मित्राला जायला सांगितलं. 

हेसुद्धा वाचा : वडिलांच्या मदतीने 16 वर्षीय मुलाकडून 22 वर्षीय गर्लफ्रेंडची हत्या; बिहारमधून आरोपी ताब्यात

 

मित्र तिथून जाताच आरोपीनं पीडित मुलासोबत दुष्कृत्य करत त्याच्यावर  लैंगिक अत्याचार केले. या घटनेनंतर पीडित घरी आला आणि त्यानं सर्व प्रकार घरी सांगितला. पण, नाचक्कीच्या भीतीपोटी घरातील मंडळींनी कोणााही याबाबत माहिती दिली नाही. पीडिताच्या मामाला याची माहिती मिळाल्यानंतर त्यानं पोलिसांत जाऊन झाल्या प्रकाराची तक्रार केली. 

Read More