Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

आई, मुलगी आणि प्रियकर! क्राईम वेबसीरिज पाहून काढला वडिलांचा काटा, पुणे पोलिसांनी 230 CCTV तून...

Pune Crime : वडिलांच्या प्रेमाला विरोध होता म्हणून आई आणि प्रियकराच्या मदतीने लेकीने वडिलांना मृत्यूच्या दाढीत पोहोचवले. पोलिसांनी या प्रकरणात धक्कादायक खुलासे केले आहेत. 

आई, मुलगी आणि प्रियकर! क्राईम वेबसीरिज पाहून काढला वडिलांचा काटा, पुणे पोलिसांनी 230 CCTV तून...

Pune Crime : पुण्यात नात्याला काळीमा फासणारी घटना समोर (Pune Shocking Crime) आली आहे. बापलेक आणि पत्नी पत्नीचा नात्याचा खून करणाऱ्या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. वडिलांचा मुलीच्या प्रेमाला विरोध होता. म्हणून मुलीने आई आणि बॉयफ्रेन्डचा मदतीने वडिलांचा काटा काढला. या हत्येचा छडा लावताना पोलिसांना तपासात धक्कादायक खुलासे केले आहेत. 

असा रचला हत्याकांड 

1 जूनला पोलिसांना जळालेल्या अवस्थेत एक मृतदेह सापडलं. त्यानंतर पोलिसांचा तपास सुरु झाला. या मृतदेहाचे गूढ उलगडण्यात अखेर पोलिसांना यश आलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जॉन्सन कॅजिटन लोबो यांच्या अल्पवयीन मुलीचं अग्नेल जॉय कसबे यांच्यासोबत प्रेम होते. वडिलांचे मुलीच्या प्रेमसंबंधाला विरोध होता तर आईचा मुलीला पाठिंबा होता. मुलीच्या प्रेमप्रकरणावर नवरा बायकोचे कायम वाद होत होते. 

यातून मिळाली हत्येची आयडिया

रोजच्या भांडण आणि प्रेमाला विरोध असल्याने मायलेकीने वडिलांच्या हत्येचा कट रचला. OTT वरील वेगवेगळ्या क्राईम वेबसीरिजमधून त्यांनी हत्येचा सर्व घटनाक्रम तयार केला. आई, मुलगी आणि प्रियकर या तिघांनी मिळून 30 मे 2023 च्या मध्यरात्री जॉन्सन घरात झोपले असताना. या तिघांनी क्रूरपणाची हद्द पार केली. जॉन्सनच्या डोक्यात वरवंटा घालून मानेवर चाकूने वार करण्यात आले. 

एक दिवस त्याचा मृतदेह घरातच ठेवा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मृतदेह कारमधून नगर रस्त्यावरील सणसवाडी परिसरात नेण्यात आला. तेथील खुल्या जागेत त्या मृतदेहावर पेट्रोल टाकून त्यांनी जाळून टाकलं. (pune crime mother daughter murder father who opposed the love affair with help boyfriend watching crime web series pune Police)

fallbacks

मृत्यूनंतर तिने असं पतीला ठेवलं जिवंत

आपल्या पतीचा आपणच खून केला आहे याचा संशय येऊन नये म्हणून तिने जॉन्सनचा मोबाईल सुरु ठेवला. आश्चर्यकारक म्हणजे ती दररोज पतीच्या मोबाइलवरील स्टेट्स अपडेट करायची. एवढंच नाही तर 4 जूनला त्याचा वाढदिवस होता. तिने त्याचा वाढदिवसाचा स्टेट्सही अपडेट केला. त्यामुळे तो गायब झाला आहे किंवा जिवंत नाही असं कोणात्याची लक्षात आलं नाही. पण पोलिसांच्या तपासा यंत्रेणेसमोर याची ही युक्ती फेल झाली. 

पुणे पोलिसांनी 230 CCTV तून...

या घटनेचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी जवळपास  230 CCTV तपासल्यानंतर त्या गाडीचा शोध लागला. या संशयास्पदरीत्या गाडीवरुन पोलिसांनी आरोपींचा माग घेतला. या तपासातून अग्नेल हा गाडी चालवत असल्याचं समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी या तिघांना अटक केली. 

 

Read More