Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

Pune बर्निंग कारचा थरार, चालकाने जळती कार 6 किमी पर्यंत पळवत इतरांचा जीव आणला धोक्यात

पुणे-नगर मार्गावर जळत्या कारचा थरार पहायला मिळाला.

Pune बर्निंग कारचा थरार, चालकाने जळती कार 6 किमी पर्यंत पळवत इतरांचा जीव आणला धोक्यात

पुणे : पुणे-नगर मार्गावर जळत्या कारचा थरार पहायला मिळाला. शिक्रापूरजवळच्या कासारी फाटा इथं रात्री कार आणि बाईकचा भीषण अपघात झाला. त्यात कारचा टायर फुटला. मात्र तरी देखील चालकानं घटनास्थळावरून पळ काढला. आणि तब्बल सहा किलोमीटर अत्यंत धोकादायक पद्धतीनं कार दामटवत चालकानं शिक्रापूर गाठलं. 

गाडीचा टायर फुटल्यानं मॅकव्हिल रस्त्यावर घासल्यामुळे ठिणग्या उडत होत्या. चालकाचं नसतं धाडस महामार्गावरून प्रवास करणाऱ्या इतर प्रवाशांच्या जीवावर बेतलं असतं.

पाहा थरारक व्हिडिओ

Read More