Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

पुण्यातील बालेवाडीतून अपहरण झालेला 'डुग्गू' अखेर सापडला, अपहरणाचं कारण अस्पष्ट

आठवडभरापासून बेपत्ता असलेल्या स्वर्णवच्या वडिलांनी भावनिक पोस्ट केली होती

पुण्यातील बालेवाडीतून अपहरण झालेला 'डुग्गू' अखेर सापडला, अपहरणाचं कारण अस्पष्ट

अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : पुण्यातून अपहरण करण्यात आलेला चार वर्षांचा चिमुकला अखेर सापडला आहे. डॉ सतीश चव्हाण यांचा मुलगा स्वर्णव उर्फ डुग्गू या 4 वर्षांच्या मुलाचं आठवडाभरापूर्वीं बाणेर परिसरातून अपहरण करण्यात आलं होतं. तेव्हापासून पुणे पोलीस तसंच त्याचे नातेवाईक कसून शोध घेत होते. 

सोशल मीडियावर त्याबाबतची पोस्ट सर्वत्र व्हायरल झाली होती. स्वर्णव लवकरात लवकर सापडावा यासाठी सर्वजण प्रार्थना करत होते. आठवडा उलटूनही त्याचा शोध लागत नसल्याने चिंता व्यक्त केली जात होती. स्वर्णवच्या शोधासाठी जवळपास 300 पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी आणि अधिकारी शोध घेत होते. 

वाकडजवळ सापडला स्वर्णव
आज दुपारच्या सुमारस वाकड जवळील पुनावळे ब्रीजजवळ स्वर्णव सापडला. त्याला या ठिकाणी सोडून देण्यात आलं होतं. त्याचं कोणी अपहरण केलं? कोणत्या कारणासाठी केलं, याबाबत अद्याप माहिती मिळालेली नसून पुणे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

स्वर्णवच्या वडिलांनी केली होती भावनिक पोस्ट
सतिश चव्हाण पुण्यातील बालेवाडीत राहतात त्यांच्या ४ वर्षाच्या मुलाचं अपहरण करण्यात आलं होतं. स्वर्णव चव्हाण असं या मुलाचं नाव आहे, त्याला घरी प्रेमाने डुग्गू म्हणतात. चिमुरडा घरात नसल्याने जन्मदाता खचला होता.  त्यांनी सोशल मीडियावर अपहरणकर्त्यांना आवाहन केलं होतं, ''हवे तेवढे पैसे घ्या, मागाल ते देतो, पण काळजाचा तुकडा परत द्या'' स्वर्णवला ताप आल्यास त्याला कोणतं सिरप, द्यावं त्याचं आवडतं सिरप कोणतं हे देखील, सतिश चव्हाण यांनी आपल्या पोस्टमध्ये सांगितलं होतं. 

fallbacks

'माझा मुलगा डुग्गूबद्दल कुठलीही माहिती नाही. आम्हाला तो सापडला का, हे विचारायला फोन नको, कधी झाले, कसे झाले. तुमच्याकडे कुठलीही महत्त्वाची याच्याशी संबंधित माहिती असेल, तर प्लिज फोन करा. 'ज्या कोणी त्याला नेले आहे, मला माझा मुलगा परत द्या, फक्त एकदा फोन करा, तुम्ही मागाल ते आम्ही देऊ, प्लीज आम्हाला फोन करा.' चव्हाण यांनी औषधाचा फोटो देखील शेअर केला होता.

Read More