Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

पब-जी खेळण्यासाठी विरोध केला म्हणून शेजारी महिलेवर हल्ला

पब-जी गेम हा विरंगुळा नसून व्यसनापेक्षा कमी नाही हे स्पष्ट झालंय 

पब-जी खेळण्यासाठी विरोध केला म्हणून शेजारी महिलेवर हल्ला

आतिष भोईर, झी २४ तास डोंबिवली : डोंबिवलीत पब-जी खेळण्याला विरोध केला म्हणून एका महिलेवर हल्ला केल्याची घटना घडलीय. या प्रकरणी डोंबिवली पोलिसांनी हल्लेखोर शेजाऱ्यांवर गुन्हा दाखल केलाय.

पब-जी या व्हिडिओ गेमचं खूळ तरूणांच्या डोक्यातून जायला तयार नाही. जिथं पाहा तिथं तुम्हाला पब-जी खेळणारे तरूण तरूणी दिसतील. तरूणाई पब-जीसारख्या खेळाच्या एवढी आहारी गेलीय की त्यांना नात्यागोत्यांचाही विसर पडलाय. डोंबिवलीतल्या ठाकुर्लीत राहणाऱ्या एका महिलेला शेजारी तरूण तरुणींनी मारहाण केलीय. आरोपी तरूण तरूणी इमारतीच्या जिन्यात रात्रंदिवस पब-जी खेळत होते. गेम खेळताना रात्री उशीरापर्यंत सुरु असलेल्या गोंधळाला विरोध केल्यानं या महिलेला मारहाण करण्यात आली.

fallbacks
पीडित महिला

सुरुवातीला पोलिसांनी या प्रकरणात अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता. प्रकरणाचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय.
 
पब-जी गेम सुरुवातीपासूनच वादात सापडलाय. पब-जी गेम हा विरंगुळा नसून व्यसनापेक्षा कमी नाही हे आता हळूहळू स्पष्ट होऊ लागलंय.

Read More