Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

भ्रष्टाचारावर नजर ठेवणार खासगी संस्था, सरकारची अजब शक्कल

प्राप्त माहितीनुसार, या संस्थेतील अनेक सदस्य महसूल विभाग, मुद्रांक नोंदणी विभाग भूमी अभिखक्ष सह अनेक विभागावर सातत्याने लक्ष ठेवून आहेत.

भ्रष्टाचारावर नजर ठेवणार खासगी संस्था, सरकारची अजब शक्कल

नाशिक:  विविध विभागांमध्ये होणारा भ्रष्टाचार रोखण्यासाठी राज्यातील लाचलुचपत विभागाला अपयश आले आहे. त्यामुळे यावर उतारा म्हणून राज्य सरकारने एक भलताच जालीम उपाय योजला आहे. हा उपाय म्हणजे यापुढे होणाऱ्या भ्रष्टाचारावर चक्क खासगी संस्था नजर ठेऊन असणार आहे. राज्य सरकारने अशा खासगी संस्थेची नियुक्तीसुद्धा केली आहे.

प्राप्त माहितीनुसार, या संस्थेतील अनेक सदस्य महसूल विभाग, मुद्रांक नोंदणी विभाग भूमी अभिखक्ष सह अनेक विभागावर सातत्याने लक्ष ठेवून आहेत. लाचलुचपत विभाग तुलनेत अपयशी ठरत असल्याने तसेच भ्रष्ट व्यवस्था कमी होत नसल्याने हा उपाय राबविण्यात येत आहे. त्यामुळे शासकीय अधिकाऱ्यांनी आता अशा सदस्यांवर लक्ष ठेवायला सुरुवात केली आहे . मध्यंतरीच्या काळात या संस्थेची नाशिक जिल्ह्यात बैठक झाली होती. ही  संस्था जनतेशी संबंधीत अधिकारी आणि शासकीय अधिकारी तहसीलदार आणि विविध अधिकार्यावर लक्ष ठेवत आहे 

 

Read More