Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

अंबरनाथमध्ये शिकवणीच्या शिक्षकाकडून लहानग्याला मारहाण

स्पेलिंग चुकले म्हणून एका ५ वर्षांच्या मुलाला शिकवणीच्या शिक्षकाने बेदम मारहाण केली. 

अंबरनाथमध्ये शिकवणीच्या शिक्षकाकडून लहानग्याला मारहाण

अंबरनाथ : स्पेलिंग चुकले म्हणून एका ५ वर्षांच्या मुलाला शिकवणीच्या शिक्षकाने स्टीलच्या पट्टीने बेदम मारहाण केली. या संतापजनक प्रकारानंतर अंबरनाथ शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल केला करण्यात आला आहे. दरम्यान, लहानग्याच्या शरीरावरच नव्हे, तर मनावरही आघात झाल्याचे सांगण्यात आले आहेत. हा मुलगा प्रचंड दडपणाखाली आहे. 

अंबरनाथ पूर्वेच्या राहुल इस्टेट परिसरात असलेल्या युरेकीड्स क्लासेसमध्ये हा प्रकार घडला. या क्लासमध्ये ग्रीनसिटी भागात राहणारा ५ वर्षीय मुलगा ट्युशनसाठी जात होता. मंगळवारी त्याला क्लासचा शिक्षक नितेश प्रधान याने स्पेलिंग येत नसल्याच्या कारणावरून स्टीलच्या पट्टीने बेदम मारहाण केली.

fallbacks

बुधवारी या मुलाला अंघोळ घालत असताना त्याच्या आईला त्याच्या अंगावर हिरवे निळे झालेले वळ दिसले. याबाबत विचारणा केली असता मुलाने नितेश प्रधान याचे नाव सांगितले. यानंतर मुलाच्या आईने थेट पोलिसात धाव घेत प्रधान याच्याविरोधात तक्रार दिली आहे. त्यानुसार प्रधान याच्याविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी प्रधान याला कडक शिक्षा करण्याची मागणी करण्यात येत असून या घटनेनंतर अंबरनाथ शहरात संतापाचे वातावरण आहे. 

Read More