Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

Pune Crime : ऑडिशनच्या बहाण्याने पुण्यातील तरूणीसोबत धक्कादायक प्रकार समोर!

फेसबुकवर ऑडिशन होणार असल्याची एक जाहिरात दिसली  न ती  तिथेच फसली!

Pune Crime : ऑडिशनच्या बहाण्याने पुण्यातील तरूणीसोबत धक्कादायक प्रकार समोर!

Pune Crime News : चित्रपटात किंवा टीव्ही मालिकेत काम करत पडद्यावर झळकण्यासाठी तरूण-तरूणींचा कल मोठ्या प्रमाणात असलेला दिसतो. (Pune Crime News) यासाठी इंटरनेटवर सर्च (Internet Search) करून भामट्यांच्या संपर्कात येतात आणि स्वत: ची फसवणूक करून घेतात. अशाच प्रकारची पुण्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. (Pune marathi crime News) 20 वर्षाच्या तरूणीची फसवणूक झाली आहे. फसवणूक झाल्याचं लक्षात येताच पीडित तरूणीने पोलिसात धाव घेतली आहे. (pretext of an audition a shocking incident with a young woman from Pune latest marathi crime news pune)

नेमकं काय घडलं? 
पुण्यातील एका वसतीगृहामध्ये राहणाऱ्या तरूणीला मालिकेमध्ये काम करण्याची इच्छा होती. तिला फेसबुकवर ऑडिशन होणार असल्याची एक जाहिरात दिसली त्यानंतर तिने संपर्क साधला. जाहिरातीमध्ये हिंदी मालिका आणि चित्रपटासाठी ऑडिशन असल्याचं सांगण्यात आलं होतं. 

पीडित मुलीचा आरोपींनी विश्वास जिंकत तिला भूलथापा देत पैशांची मागणी केली. अनेकवेळा पैशांची मागणी करून तिच्याकडून जवळपास 71 हजार 849 रूपये वसूल केले. पैसे जमा केल्यावर कोणतीच ऑडिशन झालं नाही. मात्र तरूणीने पैसे दिले होते त्यामुळे तिने विचारणा केल्यावर तिला उडवाउडवीची उत्तरे देण्यात आलीत. तरूणीला लक्षात आलं की तिची फसवणूक झाली, त्यानंतर तिने येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) धाव घेत याबाबत तक्रार दाखल केली.

दरम्यान, तरूणीने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी चंद्रशेखर शर्मा (रा. चंदीगड), आशासिंग, क्रिशन चांद (रा. पंजाब) यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक उत्तम चक्रे करत आहेत. या प्रकरणानंतर आता तरूणांनी अशा फसव्या ऑडिशनपासून सतर्क राहायला हवं.

Read More