Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

कोरोना काळात केंद्र सरकार राज्याला मदत करणार - प्रकाश जावडेकर

कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्यामुळे सरकार लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल करत आहे.

कोरोना काळात केंद्र सरकार राज्याला मदत करणार -  प्रकाश जावडेकर

पुणे : राज्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्यामुळे सरकार लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल करत आहे. आज पुण्यात देखील जनता कर्फ्यू करण्यात आला असून पुणेकरांनी कर्फ्यूला चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे केंद्रीय मंत्री  प्रकाश जावडेकर यांनी पुणेकरांचे आभार मानले. जनता कर्फ्यू सारख्या भावनेनी कोरोना कर्फ्यूचं अतिशय उत्तम पालन केलं. कारण कोरोनाची साळखी तोडण्यासाठी प्रत्येकाने नियमांचं पालन केलं पाहिजे. असं देखील जावडेकर म्हणाले. कोरोना संकटात केंद्र सरकार मदत करत असल्याचं देखील ते म्हणाले. 

केंद्र सरकार महाराष्ट्रासाठी 11 हजार 21 व्हेंटिलेटर देत आहेत. पुढच्या तीन ते चार दिवसांत व्हेंटिलेटर राज्यात दाखल होतील. 700 व्हेंटिलेटर गुजरातमधून तर 421 व्हेंटिलेटर आंध्रमधून येणार आहेत. शिवाय केंद्र सरकार महाराष्ट्राला ऑक्सिजनचा पुरवठा देखील करणार असल्याचं जावडेकरांनी सांगितलं. महत्त्वाचं म्हणजे राज्यात चाचण्याचं प्रमाण देखील वाढवण्यात आलं आहे. त्यासाठी लागणाऱ्या मनुष्यबळा संबंधी देखील जावडेकरांनी भाष्य केलं. 

राज्यात कोरोना चाचण्याचं प्रमाण वाढवण्यात आलं आहे. त्यामुळे केंद्र सरकार मनुष्यबळ देखील पुरवणार आहे. नॉशलन हेल्थ मिशनमधून पैसे केंद्र सरकार राज्याला पैसे पुरवणार आहे. कोरोना संकंट हे राष्ट्रीय संकेत आहे, परिस्थिती देखील गंभीर आहे. असं देखील जावडेकर म्हणाले. 

Read More