Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

पूनम महाजन, रावसाहेब दानवे यांचा पत्ता कट; भाजपकडून धैर्यशील पाटील यांना राज्यसभेची उमेदवारी

 Maharashtra politics : भाजपकडून धैर्यशील पाटील यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.  

पूनम महाजन, रावसाहेब दानवे यांचा पत्ता कट; भाजपकडून धैर्यशील पाटील यांना राज्यसभेची उमेदवारी

Dhairyasheel Patil, Rajyasabha Candidate : राज्यात होणाऱ्या आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी भारतीय जनता पक्षाने जाहीर केली आहे.  केंद्रीय निवडणूक समितीने सोशल मिडियावर यादी प्रसिद्ध केली आहे. पूनम महाजन, रावसाहेब दानवे  यांचा पत्त कट झाला आहे. भाजपकडून धैर्यशील पाटील यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. 

भाजपकडून राज्यसभेसाठी जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांची यादी?

आसाम -  मिशन रंजन दास , रामेश्वर तेली 
बिहार -  मनन कुमार मिश्र 
हरियाणा -  श्रीमती किरण चौधरी 
मध्य प्रदेश -  जॉर्ज कुरियन 
महाराष्ट्र -  धैर्यशील पाटील 
ओडिशा -  श्रीमती ममता मोहंता 
राजस्थान -  सरदार रबनित सिंह बट्टू 
त्रिपुरा - राजीव भट्टाचार्जी 

महाराष्ट्रात या नावांची चर्चा

राज्यसभेसाठी महाराष्ट्रात पूनम महाजन, विजया रहाटकर, धैर्यशील पाटील, आशिष देशमुख आणि रावसाहेब दानवे यांच्या नावांची विचार होणार असल्याची सूत्रांची माहिती होती.  पंकजा मुंडे यांच्या प्रमाणे पूमन महाजन यांचे राजकीय पुनर्वस होईल अशी चर्चा होती.  विजया रहाटकर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा होत्या.  रहाटकर राजस्थान विधानसभेच्या सहप्रभारी होत्या. रावसाहेब दानवे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. केंद्रीय मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष राहीले आहेत. आशिष देशमुख हा विदर्भातील चेहरा आहे.  माजी आमदार असलेले आशिष देशमुख कुणबी समाजाचे नेतृत्व करतात. काँग्रेस, भाजप, पुन्हा काँग्रेस आणि आता भाजप असा त्यांचा प्रवास आहे. या सर्वांना भाजपने उमेदवारी देऊ असा शब्द दिला होता. 

धर्यशील पाटील यांना मिळाली उमेदवारी

दिग्गज नेत्यांना डावलून भाजने धर्यशील पाटील यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. धर्यशील पाटील हे पेणचे माजी आमदार आहेत. 2014 ला पेण मतदारसंघाचं विधानसभेत प्रतिनिधित्व केलं. 2019 च्या विधानसभा  निवडणुकीत त्यांचा पराभव  झाला होता. धैर्यशील पाटील यांनी 2023 मध्ये शेकाप मधून भाजप मध्ये प्रवेश केला. धैर्यशील पाटील हे लोकसभेसाठी इच्छुक होते, मात्र अजित पवारांसोबत महायुती झाल्याने तटकरेंना तिकीट देण्यात आले. अखेर भाजपने त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. 

 

Read More