Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

धुळे येथे पोलीस उपनिरीक्षक चाकू हल्ल्यात गंभीर जखमी

राग येऊन एका पोलिसाने मुख्यालयातील राखीव पोलीस उपनिरीक्षकांवर चाकू हल्ला केला.  

धुळे येथे पोलीस उपनिरीक्षक चाकू हल्ल्यात गंभीर जखमी

धुळे : गैरवर्तन केल्याचा कसुरी अहवाल वरिष्ठ अधिकार्‍यांकडे पाठविल्याचा राग येऊन एका पोलिसाने मुख्यालयातील राखीव पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बनतोडे यांच्यावर चाकू हल्ला केला. या हल्ल्यात बनतोडे हे गंभीर जखमी झाले असून पोलिसाविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.  

बनतोडे यांनी पोलीस नाईक संजय पवार हा गैरहजर होता, याची नोंद घेतली होती. याचा राग येऊन पवारने उपनिरीक्षक बनतोडे यांना शिवीगाळ करत गैरवर्तन केले होते. याबाबत बनतोडे यांनी पवारचा गैरवर्तणुकीची कसुरी अहवाल पोलीस अधीक्षकांकडे सादर केला होता.

यामुळे सतंप्त झालेल्या पवारने पोलीस मुख्यालयाच्या आवारात उपनिरीक्षक बनतोडे यांना मारहाण करुन त्यांच्यावर चाकू हल्ला केला. या हल्ल्यात बनतोडे यांच्या दोन्ही पायांच्या गुडघ्यावर आणि हाताच्या पंजावर जखम झाली आहे. त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.

Read More