Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

घे चुना मळ पुन्हा! शेतातील घरात सुरु होता तंबाखूचा नको तो उद्योग

या ठिकाणाहून 152 किलो सुगंधित तंबाखू, ब्रॅण्डेड कंपनीचे रिकामे डब्बे, पॅकिंग मशीन, इलेक्ट्रॉनिक वजन काटे, बॅच नंबर छापण्याचे प्रिंटर, पॅकिंग साहित्य असा 18 लाख 93 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

घे चुना मळ पुन्हा! शेतातील घरात सुरु होता तंबाखूचा नको तो उद्योग

पराग ढोबळे,  झी मीडिया, नागपूर : शेत घरात सुरु असलेला बनावट तंबाखूचा कारखान(tobacco factory) पोलिसांनी उद्धवस्त केला आहे. नागपूरमध्ये(Nagpur) छुप्या पद्धतीने हा कारखाना सुरु होता. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी या कारखान्यावर कारवाई केली आहे. पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बनावट तंबाखूचा साठा हस्तगत केला आहे.  

नागपुर जिल्ह्यातील खापा पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा बनावट तंबाखूचा कारखाना सुरु होता. पोलिसांनी या कारखान्यावर धाड टाकली आहे. या कारवाई दरम्यान 19 लाखाचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केला आहे.  खापाच्या वेलतुर परिसरातील शेतातील घरात हा कारखाना सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. याच ठिकाणी धाड टाकून बनावट तंबाखू कारखान्यावर कारवाई करण्यात आली. 

या ठिकाणाहून 152 किलो सुगंधित तंबाखू, ब्रॅण्डेड कंपनीचे रिकामे डब्बे, पॅकिंग मशीन, इलेक्ट्रॉनिक वजन काटे, बॅच नंबर छापण्याचे प्रिंटर, पॅकिंग साहित्य असा 18 लाख 93 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.  यावेळी अन्न प्रशासन विभागाची मदत घेण्यात आली. यात मुख्य आरोपी दुर्गेश विजय अग्रवालचा शोध सुरू असून इतर तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. तंबाखू ब्रॅण्डेड कंपनीच्या डब्यात भरून विकली जात होती.  

 

Read More