Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

Pune Job: पुणे पालिकेअंतर्गत नोकरीची संधी, 1 लाखांच्या पुढे पगार; 'येथे' होणार मुलाखत

PMC Recruitment: पुणे महानगरपालिकेअंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे.

Pune Job: पुणे पालिकेअंतर्गत नोकरीची संधी, 1 लाखांच्या पुढे पगार; 'येथे' होणार मुलाखत

PMC Recruitment: पुण्यामध्ये चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे.पुणे महानगरपालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा,अर्जाची शेवटची तारीख, पगार यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. यासाठी कोणती लेखी परीक्षा घेतली जाणार नसून थेट मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. पुणे महानगरपालिकेअंतर्गत होणाऱ्या या भरतीत प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ निवासी, ट्यूटर/डेमाँनस्ट्रेटर, कनिष्ठ निवासी अशी एकूण 46 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. 

रिक्त जागांचा तपशील

प्राध्यापक पदाच्या 4 रिक्त जागा भरण्यात येणार असून यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय खुल्या प्रवर्गासाठी 50 वर्षे आणि राखीव प्रवर्गासाठी 55 वर्षे इतके असावे. या पदावर निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 1 लाख 85 हजार रुपये इतका पगार दिला जाणार आहे. सहयोगी प्राध्यापकच्या 10 जागा भरल्या जाणार असून यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय खुला प्रवर्गासाठी 45 वर्ष तर राखीव प्रवर्ग 50 वर्षे इतके आहे. निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 1 लाख 70 हजार इतका पगार दिला जाणार आहे.सहाय्यक प्राध्यापकच्या एकूण 14 जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी खुला प्रवर्ग 40 वर्ष तर मागास प्रवर्गासाठी 45 वर्ष इतके असावे. निवड झालेल्या उमेदवाांना 1 लाख इतका पगार दिला जाईल. 

वरिष्ठ निवासीच्या 13 जागा भरल्या जाणार असून 45 वर्षापर्यंतचे उमेदवार यासाठी अर्ज करु शकतात. निवड झालेल्या उमेदवारांना 80 हजार 250 इतका पगार दिला जाईल. ट्यूटर/डेमॉन्स्ट्रेटरची 1 आणि ज्युनिअर रेसिडंटच्या एकूण 4 जागा भरल्या जाणार आहेत. खुल्या गटासाठी 38 वर्षे तर मागास वर्गासाठी 43 वर्षे इतकी वयोमर्यादा आहे.  या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 64 हजार 551 रुपये इतका पगार दिला जाणार आहे.

निवडीचे निकष

7 निकषांद्वारे उमेदवाराची निवड केली जाणार आहे. यामध्ये पीएचडी, इतर शिक्षण, अनुभव, शिक्षणासंबंधी अनुभव, डिर्जटेशन प्रकाशन इनडेक्स, पुस्तके आणि संदर्भ पुस्तके, मुलाखत हे निकष पाहिले जातील.

कधी होणार मुलाखत?

उमेदवाराची निवड थेट मुलाखतीद्वारे होणार असून 9 ऑगस्ट, 23 ऑगस्ट, 30 ऑगस्ट रोजी मुलाखती घेतल्या जाणार आहेत. वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी तसेच ट्यूटर या पदासाठी 09 ऑगस्ट 2024, 23 ऑगस्ट आणि 30 ऑगस्ट 2024 सकाळी 11 वाजता मुलाखत घेण्यात येईल. प्रोफेसर,असोसिएट प्रोफेसर,असिस्टंट प्रोफेसर या पदासाठी – 09 ऑगस्ट 2024, 23 ऑगस्ट आणि 30 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 3.00 वाजता मुलाखत घेण्यात येईल, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. 

कुठे होणार मुलाखत 

उमेदवारांनी आपल्या आवश्यक कागदपत्रांसह दिलेल्या तारखेला भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल मंगळवार पेठ, पुणे या पत्त्यावर मुलाखतीसाठी उपस्थित रहावे लागणार आहे. ही भरती कायमस्वरुपी नसून कंत्राटी स्वरुपाची असेल याची नोंद घ्या.

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

Aadhaar मध्ये नोकरी आणि दीड लाखांच्यावर पगार, 'असा' करा अर्ज

Read More