Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

'फॉर्च्युनर'मध्ये कचरा टाकण्याच्या पिंपरी-चिंचवडच्या प्रकरणाला वेगळं वळण

पिंपरी चिंचवडच्या फॉर्च्युनर कचरा प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. 

'फॉर्च्युनर'मध्ये कचरा टाकण्याच्या पिंपरी-चिंचवडच्या प्रकरणाला वेगळं वळण

पिंपरी-चिंचवड : सर्व्हिसिंग व्यवस्थित झाली नाही म्हणून ४० लाखांच्या फॉर्च्युनर गाडीत कचरा भरण्याच्या पिंपरी चिंचवडमधल्या प्रकरणाला आता वेगळंच वळण लागलंय. गाडीचा मालक राजेश चौधरी यानं त्याच्या मित्राला वाचवण्यासाठी ही स्टंटबाजी केल्याचा आरोप शरयू टोयोटा शोरुमनं केला आहे. फोर्चूनर गाडी राजेश चौधरी वापरत नसून, त्याचा मित्र अमित मेश्राम ती गाडी वापरतो. अमित मेश्रामननं शोरुममध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याशी असभ्य वर्तन केलं होतं. त्या प्रकरणी संबंधित महिला कर्मचार्यांनी वरिष्ठांकडे तक्रारही केली होती. म्हणूनच या प्रकरणात आपल्या मित्राला वाचण्यासाठी राजेश चौधरीनं फॉर्च्युनर गाडीत कचरा भरण्याची स्टंटबाजी केल्याचा आरोप शोरुमनं केलाय. या प्रकरणी आम्ही राजेश चौधरीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यानं प्रतिक्रिया द्यायला टाळाटाळ केली. तर गाडीमध्ये कोणतीही उणीव नसतानाही नाहक बदनामी केल्याप्रकरणी राजेश चौधरी आणि अमित मेश्राम विरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचं शरयू टोयोटा शोरुमच्या वकिलांनी स्पष्ट केलंय.  

Read More