Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

ट्रक चालकाला मारहाण करणाऱ्या वाहतूक पोलिसाची बदली

पिंपरी चिंचवडच्या भूमकर चौकात एका ट्रक चालकाला मारहाण करणाऱ्या दत्तात्रय धावरे या वाहतूक पोलिसाची अखेर बदली करण्यात आलीय.

ट्रक चालकाला मारहाण करणाऱ्या वाहतूक पोलिसाची बदली

पुणे : पिंपरी चिंचवडच्या भूमकर चौकात एका ट्रक चालकाला मारहाण करणाऱ्या दत्तात्रय धावरे या वाहतूक पोलिसाची अखेर बदली करण्यात आलीय.

काही दिवसांपूर्वी हा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच वायरल झाला होता. धावरे याने एका टेम्पो चालकाला बेदम मारहाण केली होती.  

ह्या प्रकाराबाबत वाहतूक कर्मचारी धावरे ह्यांना विचारलं असता त्यांनी घडलेल्या प्रकाराची कबुली दिली.

मात्र टेम्पो चालक भरधाव गाडी चालवत होता. त्याला अडवण्याचा प्रयत्न केला असता त्याने अंगावर गाडी घातल्याचं धावरे यांनी म्हटलंय. अखेर धावरे यांची पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आलीय.

Read More