Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

नवी मुंबई महापालिका हद्दीतील मॉल सुरू करण्यास परवानगी

मिशन बिगेनअंतर्गत नवी मुंबई महापालिका हद्दीतील मॉल सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.  

नवी मुंबई महापालिका हद्दीतील मॉल सुरू करण्यास परवानगी

नवी मुंबई : मिशन बिगेनअंतर्गत नवी मुंबई महापालिका हद्दीतील मॉल सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यानुळे मॉलमधील व्यापारी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण आहे. राज्य सरकारने मॉल सुरु करण्याबाबत निर्णय घेतलेला नाही. मात्र, नवी मुंबईत मॉल काही अटींसह सुरु करण्यात येत आहेत. 

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता गर्दीचे ठिकाणी असणारे मॉल कोरोना काळात बंद ठेवण्यात आले आहेत. मात्र, राज्यात प्रथमच नवी मुंबईत मॉल सुरु करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. हे मॉल सुरू करत असताना अनेक अटी महापालिकेने घातल्या आहेत. मॉलमध्ये गर्दी होऊ नये यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे. नवी मुंबईमध्ये सहा मॉल आहेत. पहिल्या दिवशी फक्त सीवूडमधील सीवूड ग्रँड सेंट्रल मॉल सुरू झाला आहे. या मॉलमध्ये पहिल्या दिवशी अनेक ग्राहकांनी हजेरी लावली होती. येणाऱ्या ग्राहकांची थर्मल स्क्रिनिंग आणि आरोग्य सेतू अॅप दाखवल्यावरच प्रवेश दिला जात आहे.  

मॉल सुरु केल्याचे समाधान जास्त आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आम्ही योग्य ती काळजी घेत आहोत. अनेक दिवस मॉल बंद असल्याने नुकसान होत होते. आता कोरोना काळात मॉल सुरु होत असल्याचे आनंद आहेच. आम्ही अधिक काळजी घेऊ. आम्ही लोकांची गर्दी रोखून सोशल डिस्टन्स ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत, अशी माहिती मॉलचे प्रमुख निवेश सिंग यांनी सांगितले.

Read More