Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

तलाव झाला महाकाय गटार; नागरिक त्रस्त... वाचा नेमंक कारण काय?

 चंद्रपूर शहराच्या मध्यभागी असलेल्या रामाळा तलावातील पाण्याच्या दुर्गंधीने सध्या चंद्रपूरकर (Chatrapur) त्रस्त झाले आहेत. सामाजिक संघटनांच्या दबावानंतर कोरोना काळात या तलावातील पाणी सोडून तलावाचे खोलीकरण करण्यात आले होते. पहिल्या टप्प्यात झालेल्या या कामामुळे रामाळा तलावाची साठवण क्षमता वाढली आहे. (people in chadrapur faces dirty water in lake troubles the citizens)

 तलाव झाला महाकाय गटार; नागरिक त्रस्त... वाचा नेमंक कारण काय?

आशीष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर: चंद्रपूर शहराच्या मध्यभागी असलेल्या रामाळा तलावातील पाण्याच्या दुर्गंधीने सध्या चंद्रपूरकर (Chatrapur) त्रस्त झाले आहेत. सामाजिक संघटनांच्या दबावानंतर कोरोना काळात या तलावातील पाणी सोडून तलावाचे खोलीकरण करण्यात आले होते. पहिल्या टप्प्यात झालेल्या या कामामुळे रामाळा तलावाची साठवण क्षमता वाढली आहे. (people in chadrapur faces dirty water in lake troubles the citizens)

मात्र या तलावातील पाण्याची असलेली आवक जंगल व गटार (Jungle) अशा दोन्ही क्षेत्रातून असल्याने या ठिकाणी जलशुद्धीकरण संयंत्र बसवणे आवश्यक होते. या कामासाठी राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाच्या वतीने निधी उपलब्ध न झाल्याने दुसऱ्या टप्प्यातील हे काम रखडले आहे. परिणामी पुन्हा एकदा रामाळा तलाव (Lake) महाकाय गटार झाला आहे. 

नक्की काय आहे हे प्रकरण:  

सध्या रामाळा तलावातील पाणी स्थिर असून यामुळे तलावात मोठ्या संख्येत शेवाळ साचल्याने तलावाच्या आसपास राहणाऱ्या नागरिकांना प्रचंड दुर्गंधीचा त्रास होत आहे. हा त्रास तातडीने कमी व्हावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. चंद्रपूरकर व सामाजिक संघटनांच्या दबावानंतर झालेले एक उत्तम काम राज्य शासनाच्या उदासीन धोरणामुळे पुन्हा एकदा शून्य होणार आहे. त्याआधी रामाळा तलावाच्या जलशुद्धीकरण (Water Puritication) संयंत्र बाबत तातडीने पावले उचलावीत अशी देखील मागणी पुढे आली आहे.

Read More