Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

एसीबीकडून क्लिनचीट मिळताच एकनाथ खडसेंच्या कार्यकर्त्यांचा जळगावमध्ये जल्लोष

 एसीबीच्या क्लिनचीटनंतर खडसेंचं मंत्रिमंडळात पुनरागमन होण्याची आस कार्यकर्त्यांना लागली आहे. 

एसीबीकडून क्लिनचीट मिळताच एकनाथ खडसेंच्या कार्यकर्त्यांचा जळगावमध्ये जल्लोष

जळगाव : भोसरी येथील एमआयडीसीतील जमीन खरेदी प्रकरणी राज्य शासनाचे कोणतेही नुकसान न झाल्याचा अहवाल देत एसीबीने माजी मंत्री एकनाथ खडसे यांना क्लिनचिट दिली. एसीबीने सादर केलेल्या अहवालानंतर खडसे समर्थकांच्या आनंदाला उधान आलंय. मुक्ताईनगर, रावेस आणि जळगावात भाजप कार्यकर्ते आणि खडसे समर्थकांनी फटाके फोडून जल्लोष व्यक्त केला. एसीबीच्या क्लिनचीटनंतर खडसेंचं मंत्रिमंडळात पुनरागमन होण्याची आस कार्यकर्त्यांना लागली आहे. 

 दरम्यान, एसीबीच्या क्लिनचिटनंतर  झी 24 तासला प्रतिक्रिया देताना एकनाथ खडसे म्हणाले, सुपारी घेऊन बेछूट आरोप करण्यात आले. त्यात तत्थ नसल्याचं नेहमीच सांगत होतो, पण कुणीच ऐकून घेतलं नाही याचं जास्त दुःख आहे असं खडसेंनी म्हटलं. भोसरीतील जमीनीचा पत्नी आणि जावयाकडून कायदेशीर व्यवहार झाल्याचे त्यांनी सांगितले.  क्लीन चीट मिळाल्याने आनंद झाल्याचेही त्यांनी सांगितले. मंत्रीपद गेल्याचे दुख मला नाही.मंत्रीपदाबाबत पक्ष योग्य तो निर्णय घेईल. आरोपांनी व्यतिथ होऊन मी राजीनामा दिला होता असेही ते म्हणाले. सुपारी घेऊन माझ्यावर बेछुट आरोप केल्याचे सांगत  बहुजन समाजाच्या नेतृत्वाची बदनामी असल्याचे ते म्हणाले.

Read More