Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

ती रस्त्यावरुन चालत होती, त्याने मागून येऊन गोळी घातली... धक्कादायक घटना CCTV त कैद

लग्नाचा तगादा लावल्याने तरुणाने भररस्त्यात तरुणीला संपवलं, पालघरमधली धक्कादायक घटना

ती रस्त्यावरुन चालत होती, त्याने मागून येऊन गोळी घातली... धक्कादायक घटना CCTV त कैद

हर्षद पाटील, झी मीडिया, पालघर :  जिल्ह्यातल्या बोईसर (Boisar) परिसरात एका तरुणाने तरुणीवर भरदिवसा गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे . गोळीबाराची ही धक्कादायक घटना सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाली आहे . प्रेम प्रकरणातून हा गोळीबार झाल्याचं तपासात उघड झाला आहे. बोईसरमधल्या टिमा हॉस्पिटल जवळ ही धक्कादायक घटना घडली. 

या गोळीबारात तरुणीचा डोक्यात गोळी लागल्याने मृत्यू झाला. तर आरोपीचं नाव कृष्णा यादव असून गोळीबार करुन पळून जात भरधाव गाडी खाली उडी मारून त्याने आत्महत्या केली. गोळीबार केल्यानंतर कृष्णा पळून गेला. त्याला पकडण्यासाठी काही स्थानिकांनी पाठलाग केला. पण रस्त्यावरुन येणाऱ्या सीआयएसफच्या गाडीसमोर त्याने उडी घेतली. यात तो गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

बोईसर पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे . आरोपी कृष्णा यादव आणि मृत मुलगी यांचे प्रेमसंबंध असल्याचं समोर आलं आहे. मृत मुलगी आणि तिच्या कुटुंबियांकडून कृष्णा यादवला लग्नासाठी तगादा लावला जात होता. पण कृष्णा लग्नासाठी टाळाटाळ करत होता, अशी माहिती मृत मुलीच्या कुटुंबियांनी दिली आहे.

Read More