Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

पालघर:लोकसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा खोळंबा, १५४ व्हीव्हीपॅट यंत्रात बदल

जेवढा वेळ मतदान थांबवावं लागले, तेवढा वेळ वाढवून देण्याचा विचार असल्याची माहिती पालघरचे जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे यांनी दिलीय.

पालघर:लोकसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा खोळंबा, १५४ व्हीव्हीपॅट यंत्रात बदल

पालघर : लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सुरू असलेल्या मतदानादरम्यान बिघडलेली १५४ व्हीव्हीपॅट यंत्रे बदलण्यात आली. यंत्रात बिघाड झाल्यामुळे या केंद्रावर काही काळ मतदान थांबवावं लागलं. जेवढा वेळ मतदान थांबवावं लागले, तेवढा वेळ वाढवून देण्याचा विचार असल्याची माहिती पालघरचे जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे यांनी दिलीय. त्यामुळे साडे पाच किंवा पावणेसहा वाजेपर्यंत मतदान सुरू राहण्याची शक्यता आहे. मात्र या बिघाडासंदर्भात अद्याप कोणत्याही राजकीय पक्षानं अधिकृतरीत्या तक्रार केलेली नाही.

दरम्यान, या पोट निवडणुकीत राज्यात प्रथमच व्हीव्हीपॅट यंत्रणेचा वापर केला जात आहे. या यंत्रणेत १५ टक्के एरर अपेक्षित  होता. कारण गुजरात मध्ये या यंत्रणेचा वापर झाला असून तिथं 25 टक्के इतका एरर  आढळून आला होतं. जिथे व्ही व्ही पॅट मशीनमध्ये एरर आल्यानं मतदान प्रक्रियेला वेळ लागत आहे तिथे मतदानाची वेळ वाढवण्याची शक्यता आहे. दरम्यान भर ऊन्हात मतदानासाठी ताटकळत उभं रहावं लागत असल्यानं मतदारांमध्य संतत्प प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

Read More