Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

मालेगावात ऑक्सिजनचा तुटवडा, तासाला लागत आहेत १२ सिलेंडर

एकीकडे राज्यात कोरोना रुग्णसंख्येचा दररोज उच्चांक येत असताना दुसरीकडे आता ऑक्सिजनचा तुटवडाही पुन्हा भासू लागला आहे. मालेगावमध्ये सहारा कोविड सेंटरमध्ये केवळ एक तास पुरेल, एवढेच ऑक्सिजन सिलेंडर शिल्लक राहिले आहेत. 

मालेगावात ऑक्सिजनचा तुटवडा, तासाला लागत आहेत १२ सिलेंडर

मुंबई : एकीकडे राज्यात कोरोना रुग्णसंख्येचा दररोज उच्चांक येत असताना दुसरीकडे आता ऑक्सिजनचा तुटवडाही पुन्हा भासू लागला आहे. मालेगावमध्ये सहारा कोविड सेंटरमध्ये केवळ एक तास पुरेल, एवढेच ऑक्सिजन सिलेंडर शिल्लक राहिले आहेत. 

ही तर केवळ एका कोविड सेंटरची गत आहे. मात्र सहारासह खाजगी रुग्णालयातही ऑक्सिजन सिलेंडरची स्थिती गंभीर होऊ लागली आहे. नाशिकसह काही ठिकाणचे प्लांट बंद झाल्याने हा तुटवडा पुन्हा भासू लागल्याचं दिसतेय. 

राज्यातील महात्वाच्या शहरांमध्ये ज्याप्रमाणे कोरोनाचा उद्रेक झालेला पाहायला मिळतोय, त्याचप्रमाणे मालेगावातही कोरोना रुग्ण वेगाने वाढू लागले आहेत. एका तासाला तिथे १२ सिलेंडरची गरज भासू लागली आहे. 

२०२०मध्येही कोरोना रुग्णसंख्या वाढताच राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा भासत होता. अनेकांनी ऑक्सिजनअभावी आपले प्राणही गमावले. आता तीच परिस्थिती पुन्हा उद्भवतेय का, अशी भीती व्यक्त होतेय 

Read More