Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

ऑनलाईन मागवला कॅमेरा, बॉक्समध्ये निघाला साबण; नवी मुंबईतील तरुणाची फसवणुक

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हालाही ऑनलाईन खरेदीचा फटका बसला होता. ऑनलाईन शॉपिंग वेबसाईवरुन तिने हेडफोन मागवला होता. मात्र, घरी आला होता लोखंडाचा तुकडा.

ऑनलाईन मागवला कॅमेरा, बॉक्समध्ये निघाला साबण; नवी मुंबईतील तरुणाची फसवणुक

Navi Mumbai Crime News : सध्या ऑनलाईन शॉपिंगचे फॅड वाढले आहे. अनेकजण दुकानात जाऊन खरदे करण्यापेक्षा ऑनलाईन शॉपिंग करमे पसंत करतात. मात्र, ऑनलाईन खरेदी करताना सावधान. कारण, नवी मुंबईतील एका तरुणाची फसवणुक झाली आहे.  या तरुणाने कॅमेरा ऑनलाईन मागवला होता. मात्र, घरी पार्सल आल्यावर बॉक्समध्ये साबण निघाला आहे. याप्रकरणी कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

ॲमेझॉन ॲप वरून 60 हजार रुपये किमतीचा कॅमेरा मागवला असता त्याजागी साबण, बॅटरी, चार्जर व इतर वस्तू आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रशांत लेंडवे या तरुणाने ॲमेझॉन ॲप वरून कॅनोन एम फिफ्टी मार्क टू या कंपनीचा कॅमेरा ऑनलाईन हप्त्यावर खरेदीसाठी ऑर्डर दिली. याचे पार्सल घरी आल्यावर ते खोलून पाहिले असता त्यात सर्फ एक्सेल कंपनीचा साबण, कॅनन कंपनीचा बॅटरी चार्जर, चार्जर केबल, कॅनोन कंपनीची कॅमेरा कॅरिअर रस्सी आणि स्टील फ्लेक्सिबल पाईप अश्या वस्तू मिळून आल्या. याप्रकरणी ॲमेझॉनच्या ग्राहक केंद्राला तक्रार केली असता ऑर्डर परत मिळणार नसल्याचे सांगण्यात आल्याने तरुणाने कळंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 

मोबाईल फोनऐवजी खेळण्यातले पत्ते आणि कमरेचा पट्टा मिळाला

ऑनलाईन फसवणुकीचे दररोज नवनवीन प्रकार समोर येत असताना कल्याणातील तरुणालाही अशाच एका फसवणुकीला सामोरे जावे लागले होते. त्रिलोकी पांडे या तरुणाने ऑनलाईन ओप्पो मोबाईल मागवला होता. मात्र, प्रत्यक्षात मोबाईल फोनऐवजी या तरुणाला खेळण्यातले पत्ते आणि कमरेचा पट्टा पाठवण्यात आला. काही दिवसांपूर्वी या तरुणाला एक फोन आला, त्या फोनवरून त्रिलोकला ओप्पोची विशेष सवलत असल्याचं सांगण्यात आलं, आणि ओप्पोचा एफ 9 प्रो हा महागडा फोन अवघ्या साडेचार हजारात मिळणार असल्याचं सांगण्यात आलं. या आमिषाला भुलून त्रिलोकी यांनी हा मोबाईल विकत घेतला. मात्र, प्रत्यक्षात मोबाईलऐवजी पत्ते आणि कमरेचा पट्टा पाहून त्रिलोकी यांना धक्काचं बसला. 

मोबाईल ऐवजी साबणाची वडी

हल्ली ऑनलाई श़ॉपिंग करणाऱ्यांना सावध रहावं लागणार आहे. कारण ऑनलाईन शॉपिंग करताना फसवणुकीचे प्रकार वाढत चालले आहेत. दादरच्या सिरीज खान यांना देखील याचा विचित्र अनुभव आला. त्यांनी मागवला होता मोबाईल मात्र त्यांना मोबाईलच्या जागी मिळाली चक्क साबणाची वडी.  दहावीत असलेल्या सिराज यांच्या मुलीला 85 टक्के मिळाले. मुलीला बक्षीस म्हणून सिराज यांनी तिला 16 हजार 675 रूपयांचा शाओमी नोट 5 प्रो आॅर्डर केला आणि आॅनलाईन पेमेंट देखील केली.  मोबाईल आला खरा पण जेव्हा बाॅक्स उघडला तेव्हा मात्र सिराजयांच्या आनंदावर विरजण पडलं. बाक्स मध्ये मोबईलच्या जागी होती चक्क साबणाची वडी होती. 

Read More