Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

तुमच्या मोबाईलवर ओटीपी आला आणि...

जर तुम्हाला फोन करून तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी मागत असेल तर ...

तुमच्या मोबाईलवर ओटीपी आला आणि...

अहमदनगर : जर तुम्हाला फोन करून तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी मागत असेल तर कृपया तो देऊ नका. कारण हा ओटीपी वापरून लाखो रुपयांची फसवणूक झाल्याची २५ प्रकरणे नगरच्या पोलिसांनी उघडकीस आणली आहेत . या प्रकारणात पोलिसांनी मुंबई , नासिक आणि औरंगाबादहून तीन आरोपीना अटक केलीय . हे तिघे बजाज फायनान्स कंपनीचा डेटा आणि नाव वापरून ग्राहकांना ऑन लाईन  लुटत होते. 

अहमदनगरच्या जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात पत्रकार परिषदेत दाखविण्यात आलेले मोबाईल आणि वस्तू पोलिसांनी केवळ मोबाईल फोन करून ग्राहकांना फसविणाऱ्या टोळीकडून हस्त गत केले आहेत . प्रशांत गारमोडे हा नाशिकच्या अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या युवकाने मुंबईच्या नरेंद्र दायमाकडून बजाज फायनान्स कंपनीच्या ग्राहकांचा देता विकत घेतला होता. त्याचा आधार घेऊन प्रशांत ग्राहकांना फोन करीत असे आणि आपले बजाजचे लोन अकाउंट बंद करून देतो किंवा तुम्हाला नवीन कर्ज घेऊन देतो असे सांगून त्यांच्या मोबाईलवर असलेला ओटीपी आणि इतर माहीती काढून घेत असे.

 याच ओटीपीच्या आधारे प्रशांत फ्लिपकार्टवरून ऑनलाईन महागडे मोबाईल  खरेदी करीत असे. हे मोबाईल औरंगाबाद येथील मुहम्मद एजाज मुहम्मद इक्बाल यांच्या पत्त्यावर फ्लिपकार्टवरून मागविण्यात येत. आणि ते औरंगाबादमधील ग्राहकांना कमी किमतीत विकून हे दोघे पैसे आपसात वाटून घेत. अहमदनगरच्या संगमनेर इथल्या संतोष काकडे आणि संतोष गडाख याची अशा प्रकारातून ५० हजारांची फसवणूक झाल्याची तक्रार पुढे आल्यानंतर नगरच्या सायबर सेल न तपास सुरु केला आणि या तीन आरोपी पर्यंत पोलीस पोहोचले . 

 पोलिसांनी या माध्यमांतून तब्ब्ल २५ गुन्हे उघडकीस आणले आहेत . राज्यातल्या विविध जिल्ह्यातील ग्राहकांची फसवणूक झाल्याची हि प्रकरणे आहेत. या आरोपीना अटक केल्यानंतर त्यांना पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केलं असता त्यांची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. 

Read More