Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

कांद्याचे दर घसरल्याने उत्पादकांची निराशा

 मात्र आता कांदा प्रति क्विंटल सातशे रुपयांवर घसरला आहे. 

कांद्याचे दर घसरल्याने उत्पादकांची निराशा

नाशिक : कांद्याचे दर प्रति क्विंटल 400 ते 500 रुपयांनी घसरल्यामुळं कांदा उत्पादक शेतक-यांची पुन्हा एकदा निराशा झाली आहे. गेल्या आठवड्यात कांदा प्रति क्विंटल हजार ते बाराशे रुपयांनी विकला गेला.  मात्र आता कांदा प्रति क्विंटल सातशे रुपयांवर घसरला आहे.  

शासनाने कांदा खरेदी सुरु करण्याची मागणी

शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारनं कांदा विक्रीला अनुदान द्यावे अथवा शासनाने कांदा खरेदी सुरु करावी, अशी मागणी येवला कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासननं केली आहे. नाशिक जिल्ह्यातील लासलगावची बाजारपेठ कांद्यासाठी प्रसिद्ध आहे.

Read More