Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

अरे देवा...गावात यात्रा सुरु असताना गर्दीत थेट टेम्पो शिरला,16 वर्षीय मुलाला चिरडले

 Tempo Accident in Pune : यात्रा सुरु होती. यात्रेला मोठी गर्दीही झाली होती आणि या गर्दीत भरधाव टेम्पो शिरल्याने एकच गोंधळ उडाला.  

अरे देवा...गावात यात्रा सुरु असताना गर्दीत थेट टेम्पो शिरला,16 वर्षीय मुलाला चिरडले

पुणे :  Tempo Accident in Pune : यात्रा सुरु होती. यात्रेला मोठी गर्दीही झाली होती आणि या गर्दीत भरधाव टेम्पो शिरल्याने एकच गोंधळ उडाला. टेम्पोचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. दरम्यान, टेम्पोने दिलेल्या धडकेने 16 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. 

fallbacks

धनकवडी गावात यात्रा सुरु असताना गर्दीत अचानक टेम्पो शिरल्याने यात्रेत एकच घबराट उडाली. सजावटीसाठी रस्त्यावर लावलेल्या डिजिटल फलकासह टेम्पोने दुचाकींनाही धडक दिली. या अपघातात सनी दत्ता ढावरे (16, रा. सहकारनगर) या अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला.

या अपघातप्रकरणी टेम्पो चालक रुपेश बळीराम मालुसरे (19, रा. कोंढवा ) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांनी चालक रुपेश याला अटक केली आहे. तसेच टेम्पोमालक दत्ता घनवट याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Read More