Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

ईदच्याच दिवशी मुस्लीम कट्टरवाद्यांचा हैदोस

ईदच्या (Eid) कार्यक्रमात धार्मिक तेढ निर्माण होणारी गाणी वाजवण्यात आली. 

ईदच्याच दिवशी मुस्लीम कट्टरवाद्यांचा हैदोस

अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : अमरावतीत (Amravai) परत एकदा सर तन से जुदाच्या घोषणा दिल्या गेल्या. इतकंच नाही तर ईदच्या (Eid) कार्यक्रमात धार्मिक तेढ निर्माण होणारी गाणी वाजवण्यात आली. त्यामुळे अमरावतीचं वातावरण कोण खराब करतंय अशी चर्चा आहे. (once again sir tan se juda announcements in amravati)

गुस्ताख ए रस्सुल की एकही सजा. सर तन से जुदा. सर तन से जुदा. मुस्लीम धर्मांधाकडून सर्रास दिली जाणारी ही घोषणा. ईशनिंदा अर्थात धार्मिक भावना दुखावल्या म्हणून ही घोषणा दिली जाते. अमरावतीत पुन्हा एकदा सर तन से जुदाचे नारे घुमलेत. ईद ए मिलादच्या निमित्तानं परतवाड्यात जुलूसचं आयोजन केलं होतं. त्याच जुलूसमध्ये सर तन से जुदा हे नारे दिले गेले. इतकंच नाही तर सर तन से जुदा अशी गाणीही वाजवली गेली. परतवाडा पोलिसांनी तातडीनं कारवाई करत रात्री उशिरा शेखपुरातून दोघांना अटक केली, 8 हून अधिक जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले.

यापूर्वी अमरावतीत सर तन से जुदा नारेबाजी करत डॉ. उमेश कोल्हेंची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा हीच नारेबाजी अमरावतीत पाहायला मिळालीय. दरम्यान घोषणाबाजी करणारे PFIशी संबंधित होते, असा आरोप खासदार अनिल बोंडेंनी केलाय. सर तन से जुदा ही धर्मांध घोषणा आहे. अमरावतीत वारंवार या घोषणा दिल्या जातायत, धार्मिक तेढ निर्माण केली जातेय. त्यामुळे अशा धर्मांध घोषणा देणा-या सर अकल से जुदा असणा-यांच्या मुसक्या पोलिसांनी तातडीनं आवळायला हव्या अशी मागणी होतेय. 

Read More