Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

प्रेमप्रकरणाच्या रागातून आईनेच केली मुलीची हत्या

पोलिसांत जाऊन स्वत:च दिली गुन्ह्याची कबुली 

प्रेमप्रकरणाच्या रागातून आईनेच केली मुलीची हत्या

पुणे : ऑनर किलिंगच्या प्रकरणाचं वाढतं प्रमाण सध्या संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून गेलं आहे. गेल्या काही दिवसांपासून घडणाऱ्या अशा घटनांमध्ये आणखी दोन घटनांची नोंद झाली आहे. ज्यामध्ये आईने आपल्या पोटच्याच मुलीची हत्या केल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. मुख्य म्हणजे मुलीची हत्या केल्याचं स्वत: आईनेच पोलिसांत सांगत केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. 

बारामती येथील प्रगती नगर येथे ही घटना घडली. जेथे जन्मदात्या आईनेच मुलीची हत्या केली. ऋतूजा हरीदास बोभाटे (वय १९) मृत मुलीचं नाव असल्याची माहिती मिळत आहे. डोक्यात दगड घालून तिची हत्या केल्याची कबुली, आई संजीवनी हरीदास बोभाटेने दिलीय मुलीचं प्रेम प्रकरण असल्याचं कारण तिच्याकडून देण्यात आलं. मुलीच्या खुनानंतर स्वत: पोलीस ठाण्यात हजर राहत ही कबुली देण्यात आली. 

पुणे जिल्ह्यातील बारामतीत ही घटना घडली असतानाच आणखी एका घटनेनेही महाराष्ट्र हादरला. चंद्रपुरात मुलीच्या भावाने आणि वडिलांनीच तिच्या प्रियकराची हत्या केली. घुग्गुस परिसरात ऑनर किलिंगची ही घटना घडली. १२ मे पासून योगेश जाधव (२३) हा बेपत्ता होता. यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील निलजई खाण परिसरात जंगलात सापडल्यामुळे एकच खळबळ माजली होती.  ट्रॅक्टरमालक असलेल्या प्रभूदास धुर्वे आणि पुत्र कृष्णा धुर्वे यांनीच पोलिसांत जात त्याच्याकडून झालेल्या या गुन्ह्याची कबुली दिली. प्रेमप्रकरणातून प्रियकाराला संपवण्यात आल्याची ही घटना समोर येत आहे. 

 

Read More