Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

विदर्भात उष्णतेची लाट, तीन दिवस तापमान राहणार कायम

विदर्भात उष्णतेची लाट, तीन दिवस तापमान राहणार कायम

नागपूर : विदर्भात येत्या तीन दिवसांत उष्णतेची लाट राहणार आहे. या उष्णतेच्या लाटेचा अकोला, चंद्रपूर, नागपूर जिल्ह्यांना तडाखा बसणार आहे. याशिवाय गडचिरोली, गोंदिया, यवतमाळ आणि वर्ध्यातही उन्हाच्या झळा जाणवणार आहेत. या काळात कमाल तापमान चाळीस अंशांपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे. सरासरीपेक्षा हे तापमान साडेचार ते साडेसहा अंशांपेक्षा तापमान जास्त राहणार आहे. हवामान विभागाने या संदर्भात आदेश जारी केलाय. या संदर्भात सरकारी यंत्रणांना सतर्कतेचे आदेश देण्यात आलेत.

Read More