Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

गुलाबरावांचा 'ससा' झालाच कसा? राष्ट्रवादीचा प्रश्न

शिवसेना नेते आणि सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या जळगाव ग्रामीण मतदार संघातील धरणगावात झालेल्या जाहीर सभेत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शिवसेनेवर तोफ डागलीय.

गुलाबरावांचा 'ससा' झालाच कसा? राष्ट्रवादीचा प्रश्न

जळगाव : शिवसेना नेते आणि सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या जळगाव ग्रामीण मतदार संघातील धरणगावात झालेल्या जाहीर सभेत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शिवसेनेवर तोफ डागलीय.

आमदार असताना गुलाबराव पाटील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर डरकाळ्या मारायचे. मात्र, मंत्रीपद मिळाल्यानंतर सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांची वाघाची शेळी आणि आता शेळीऐवजी त्यांचा 'ससा' झाला, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केलीय.

'सेनेकडे गाढव घेऊन जाणार'

तर सत्तेला लाथाडायची भाषा करणारे गुलाबराव पाटील फक्त पोकळ डरकाळ्या फोडतात, मात्र सत्तेला कशी लाथ मारायची? हे दाखविण्यासाठी सेनेकडे आपण गाढव घेऊन जाणार असल्याची बोचरी टीका यावेळी धनंजय मुंडे यांनी केलीय. 

Read More