Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

Sharad Pawar on BJP: राष्ट्रवादीचा भाजपाला पाठिंबा, शरद पवारांनी सांगितलं कारण

Sharad Pawar on BJP: राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) नागालँडमध्ये (Nagaland) एनडीपीपी-भाजप (NDPP-BJP) आघाडी सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. सत्तेत भाजपा सहभागी असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांनी यामागील कारण सांगितलं आहे.   

Sharad Pawar on BJP: राष्ट्रवादीचा भाजपाला पाठिंबा, शरद पवारांनी सांगितलं कारण

Sharad Pawar on BJP: नागालँडमध्ये (Nagaland) एनडीपीपी-भाजप (NDPP-BJP) आघाडीचं सरकार येणार असल्याचं स्पष्ट आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसनेही (NCP) नागालँडमध्ये आपली छाप पाडलेली असून सात जागा जिंकल्या आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने विरोधी पक्षात न बसता सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला असल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भाजपाला विरोध असताना राष्ट्रवादीने पाठिंबा दिल्याने चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी यामागील कारण स्पष्ट केलं आहे. 

शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आमचा पाठिंबा भाजपाला नसून तेथील मुख्यमंत्र्यांना असल्याचं सांगितलं आहे. तसंच मेघालयात राजकीय स्थैर्य येण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचंही म्हटलं आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारात मेघालयाच्या मुख्यमंत्र्यांवर टीका केली असतानाही आता सत्तेत सहभागी झाल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं. नागालँडमध्ये एनडपीपीचे प्रमुख नेफ्यू रियो यांनी पाचव्यांदा मुख्यमंत्रीपदाची (Nagaland CM) शपथ घेतली आहे. 

 

रद पवार नेमकं काय म्हणाले?

"आमचा पाठिंबा भाजपाला नसून तेथील मुख्यमंत्र्यांना आहे. त्या राज्यातील एकूण चित्र पाहिल्यानंतर एक प्रकारचं स्थैर्य येण्यास जर तेथील मुख्यमंत्र्यांना आमची मदत होत असेल तर हा आमचा एकत्रित निर्णय आहे. यामध्ये भाजपा नाही," असं शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे. 

"मेघालय आणि शेजारच्या राज्यात ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीच्या प्रचाराला देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री दोघेही गेले होते. प्रधानमंत्र्यांनी मेघालयाच्या प्रचारात तेथील मुख्यमंत्री आणि राज्यकर्ते भ्रष्टाचारी आहेत, त्यांचा पराभव करा असं आवाहन केलं होतं. आता निवडणूक झाल्यानंतर सत्तेत सहभागी झाले आणि त्यांच्या मंत्रिमंडळात आपल्या सहकाऱ्यांना घेतलं आहे. आम्ही अशी भूमिका घेतलेली नाही," असा टोलाही शरद पवारांनी यावेळी लगावला.

मविआच्या मेळाव्याबद्दल विचारलं असता शरद पवार म्हणाले की, राष्ट्रीय स्तरावर अशी एक बैठक घ्यायची आमची चर्चा आहे. अन्य पक्षांशी चर्चा करणार असून, एकत्र बैठक शक्य आहे का याची चाचपणी करणार आहे. 

नागालँडमध्ये एनडीपीपी-भाजपा आघाडीचं सरकार

नागालँडमध्ये एनडीपीपी-भाजपा आघाडीचं सरकार सत्तेवर आलं आहे. 60 आमदारांच्या नागालँड विधानसभेत एनडीपीपीचे सर्वाधिक 25 आमदार निवडून आले आहेत. भाजपा 12 जागा जिंकल्या असून आघाडीने बहुमतासाठी लागणारा 31 चा आकडा गाठला आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसनेही निवडणुकीत आपली छाप पाडली असून 7 आमदार निवडून आले आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात एकही आमदार नसलेल्या आरपीआय (आठवले गट) पक्षाचेही दोन आमदार निवडून आले आहेत. 

Read More