Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

राजकारणातून 'दमलेला बाबा' खेळण्यांच्या दुकानात जातो तेव्हा...

एक बाप म्हणून....  

 राजकारणातून 'दमलेला बाबा' खेळण्यांच्या दुकानात जातो तेव्हा...

मुंबई : धकाधकीच्या कामांतून उसंत मिळाल्यावर 'बाबा' म्हणा किंवा 'बाप माणूस' म्हणा, त्यांना ओढ असते ती म्हणजे आपल्या कुटुंबाची. आपल्या वाटेकडे डोळा लावून बसलेल्या लेकरांची. आता काही कारणाने बाबांना घरी येण्यास उशीर झाला तर या मुलांचा रुसवा तर असणारच. हाच रुसवा दूर करण्यासाठी आणि मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या अनेक दिवसांपासून सक्रिय असणाऱ्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार Rohit Rajendra Pawar यांनी एक शक्कल लढवली आहे. 

फेसबुकवर काही फोटो पोस्ट करत त्यांनी आपल्या मुलांसाठी केलेल्या खास खरेदीविषयी माहिती देत एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमधून त्यांच्यातील नेत्यासोबतच एका वडिलाच्याची मनातील भावना दाटून आल्याचं स्पष्ट होत आहे. 

गेल्या बऱ्याच दिवसांपासून राजकारणात सुरु असणाऱ्या घडामोडी पाहता एक य़ुवा नेता म्हणून हे सारंकाही आपल्याला अनेक अनुभव देणाऱ्या ठरल्या, असं सांगत अधिवेशन संपवून जेव्हा आमदार विश्वजित कदम यांच्या कारने रोहित पवार त्यांच्यासोबतच निघाले, तेव्हाच त्यांच्या नजरेस रस्त्याच्या कडेला असणारं खेळण्यांचं एक दुकान दिसलं. दुकान दिसताच तेथे जाण्याचा मोह काही त्यांना आवरता आला नाही. 

मग काय...... दुकानात जाऊन त्यांनी लगेचच आपल्या बच्चेकंपनीसाठी काही खेळणी खरेदी केली. 'बाप म्हणून जेवढा वेळ आपल्या मुलांना दिला पाहिजे तेवढा देऊ शकत नाही त्यामुळे या क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकानेच अशा छोट्या छोट्या प्रसंगातून नेहमीच आनंद शोधायचा प्रयत्न केला पाहिजे' असं लिहित रोहित पवार यांची हळवी बाजूच जणू अधोरेखित होत आहे.

मुख्य म्हणजे आपण घेतलेली खेळणी पाहून मुलांच्या चेहऱ्यावरील आनंदच आपल्याला समाधान देणारा ठरेल असं म्हणणाऱ्या रोहित पवारांची ही बाजू सध्या अनेकांचं मन जिंकून जात आहे. 

Read More