Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

सुनिल तटकरेंचा पुतण्या शिवसेनेच्या वाटेवर

 राष्ट्रवादी काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे. 

सुनिल तटकरेंचा पुतण्या शिवसेनेच्या वाटेवर

मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार अवधूत तटकरे थोड्याच वेळात उद्धव ठाकरेंची भेट घेणार असून लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे. याआधी राष्ट्रवादी नेते सुनिल तटकरे हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या. पण सुनील तटकरेंनी हे वृत्त फेटाळून लावले. आता त्यांचा पुतण्या अवधूत तटकरे हे शिवबंधनात अडकणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 

लोकसभा निवडणुकीच्याआधी देखील अवधूत तटकरेंनी उद्धव ठाकरेंची भेट घेऊन सेना प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. पण त्या चर्चेतून पुढे काही निष्पन्न झाले नव्हते. आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर याला महत्त्व आले आहे. राज्यभरात राष्ट्रवादीचे नेते शिवसेना, भाजपात जात असताना सुनील तटकरेंच्या घरातील बंडखोरी राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढवू शकते. 

Read More