Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

नेत्रोपचारांच्या माध्यमातून डोळ्यांचं आरोग्य सांभाळते ही संस्था

माणसाच्या ज्ञानेंद्रियांमध्ये डोळ्यांना आद्यस्थान आहे. हे डोळे नुसतेच सुंदर असून चालत नाहीत

नेत्रोपचारांच्या माध्यमातून डोळ्यांचं आरोग्य सांभाळते ही संस्था

पुणे : माणसाच्या ज्ञानेंद्रियांमध्ये डोळ्यांना आद्यस्थान आहे. हे डोळे नुसतेच सुंदर असून चालत नाहीत , तर ते निरोगी असणंही महत्वाचं आहे. नेत्रचिकीत्सा आणि नेत्रोपचारांच्या माध्यमातून डोळ्यांचं आरोग्य राखण्याचं काम पुण्यातील एनआयओ म्हणजेच नँशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थेल्मोलॉजी गेली २५ वर्षं करतेय. संस्थेच्या रौप्यमहोत्सवी कारकिर्दीचा हा खास वेध. 

डोळ्यांसाठी सर्वकाही

शिवाजी नगर परिसरातील एनआयओ  म्हणजे केवळ डोळ्यांचा दवाखाना किंवा रुग्णालय नाही, तर ती 'डोळ्यांसाठी सर्वकाही' हे ध्येय ठेवत कार्यरत असलेली एक स्वयंपूर्ण संस्था आहे. १९९३ मध्ये एनआयओची स्थापना झाली.

प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ श्रीकांत केळकर आणि त्यांच्या पत्नी डॉ अरुणा केळकर यांनी लावलेल्या या रोपट्याचा आता वटवृक्ष झालाय. सर्वसामान्य रुग्णाला उत्तम दर्जाची नेत्रचिकीत्सा तसेच नेत्रोपचार उपलब्ध करुन देण्याचा वसा डॉ केळकरांनी घेतला आणि तो अविरत जोपासला.

उपक्रम राबवण्यात  मोलाचा सहभाग 

या कार्यात डॉ श्रीकांत केळकरांना खरी साथ लाभली ती त्यांच्या पत्नी डॉ अरुणा केळकर यांची. आरोग्य सेवेतील गुणवत्तेवर त्यांचा भर असतो. संस्थेमध्ये विविध प्रकारचे रुग्नोपयोगी उपक्रम राबवण्यात त्यांचा मोलाचा सहभाग असतो.    

सर्वसाधारण पणे नेत्रविकार हे उतारवयात होतात असं समजल जात.  मात्र डोळ्यांच्या तक्रारी अगदी लहानपणापासूनच उद्भवू शकतात...त्यामुळे लहान मुलांच्या नेत्रचिकीत्सेसाठी एनआयओ मध्ये एक स्वतंत्र विभाग आहे. 

डोळ्यांचे आजार अनेक प्रकारचे असतात.  कार्निया , विट्रो रेटिना , मोतीबिंदू , काच बिंदू अशा अनेक  नेत्र विकारांवर एनआयओ मध्ये उपचार केले जातात. नेत्रचिकित्सा तसेच नेत्रोपचारांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हे याठिकाणचं वैशिष्ट्य आहे.

उपचारापूर्वी तसेच उपचारानंतरही रुग्णांकडे दिलं जाणारं लक्ष रुग्णाबरोबरच डॉक्टरलाही समाधान देणारं असतं. सेवेचा हा वारसा पुढच्या पिढीनंही जपला आहे. 

संस्थाचा कालानुरुप विस्तार

जेसीआय़ आणि एनएबीएच मान्यताही मिळवणा-या या संस्थाचा कालानुरुप विस्तारही होतोय.  शिवाजीनगर पाठोपाठ एन आय ओ आय हॉस्पिटलची दुसरी शाखा औध परिसरात सुरु करण्यात आली आहे, याठिकाणी विविध प्रकारची अत्याधुनिक उपकरणं उपलब्ध आहेत. रुग्णांवर उपचारांसाठी वीसहूनजास्त  निष्णात नेत्ररोगतज्ञांची टीम इथं कार्यरत आहे. वर्षानुवर्षांचा अनुभव एनआयओ बद्दलचा विश्वास वृद्धिंगत करण्यासाठी कारणीभूत ठरलाय. ही विश्वासार्हता टिकवून ठेवण्याचा ध्यास इथले डॉक्टर्स बाळगून आहेत.  

समाधानी असणं अत्यंत महत्वाचं

एनआयओमध्ये जे काही सुरु आहे त्याचा स्वाभाविक केंद्रबिंदू हा इथे येणारा रुग्ण असतो. उपचारांबद्दल तो समाधानी असणं अत्यंत महत्वाचं असतं.
 
रुग्णसेवेबरोबरच उत्तमोत्तम नेत्र रोगतज्ञ निर्माण करण्यासाठी संस्थेच्या वतीनं डीएनबी , डीओएमएस यांसारखे मान्यताप्राप्त  अभ्यासक्रमही चालवले जातात... वैद्यकीय सेवेचा वसा घेतलेल्या एन आय़ ओ च्या वतीनंअनेक सामाजिक उपक्रम , नेत्र चिकित्सा शिबीर आदींचं नियमितपणे आयोजन केलं जातं. नेत्रदान करण्याविषयी केलं जाणारं आवाहन हा ही त्याचाच एक भाग ..

डोळे हा केवळ एक अवयव नाही

आपले डोळे हा केवळ एक अवयव नाही तर दया , माया , सुख , दुःख असे नानाविध भाव त्यांत दडलेले असतात. अशा डोळ्यांची काळजी ही तशाच प्रकारच्या आपुलकीच्या भावनेतून घेतली जाणं आवश्यक ठरतं. वैद्यकशास्त्राला सामाजिक जाणीव तसेच सेवाभावाची जोड देत एनआयओनं ते सिद्ध करून दाखवलंय. रौप्य महोत्सवाच्या निमित्तानं एनआयओच्या या कार्याला मनापासून शुभेच्छा !

Read More