Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

दोन गटात तुंबळ हाणामारी, लोखंडी रॉड,तलवार, कोयत्याचा वापर

 दुसऱ्या गटाने लाठ्या -काठया ,लोखंडी रॉड,तलवारी आणि  कोयते हातात घेवून त्यांच्यावर  हल्ला केला. 

दोन गटात तुंबळ हाणामारी, लोखंडी रॉड,तलवार, कोयत्याचा वापर

मनमाड : पूर्व वैमन्यस्यातुन मनमाड शहराच्या भर बाजारपेठेत दोन गटात रात्री 8 वाजेच्या सुमारास तुंबळ हाणामारी झाली .गेल्या दोन दिवसांपासून दोन्ही गटात धुसफुस सुरु होती .त्यापैकी गट नेहरू रोडवरील एका चहाच्या दुकानावर  बसलेला असतांना दुसऱ्या गटाने लाठ्या -काठया ,लोखंडी रॉड,तलवारी आणि  कोयते हातात घेवून त्यांच्यावर  हल्ला केला. सुदैवाने या हल्ल्यात कोणी जखमी झाले नाही .मात्र भर बाजारपेठे  हत्यारांचा मुक्त वापर झाल्याने एकच  धावपळ उडाली.

तणावपूर्व शांतता 

 घटनेनंतर सर्व दुकाने पटापट  बंद झाली व  एकच दहशत पसरली असून.रात्री  उशिरापर्यंत  दोन्ही गटाकडून  पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली नव्हती. शहरात  तणावपूर्ण शांतता असून घटनास्थळावर  दंगा नियंत्रण पथक तैनात करण्यात आले असून पोलिस काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

Read More