Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

भगवा कुर्ता, गळ्यात रुद्राक्षांच्या माळा... काळाराम मंदिरात बाळासाहेबांच्या लुकमध्ये उद्धव ठाकरेंनी केली पूजा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी आज नाशिकमधल्या पंचवटीतील काळाराम मंदिरात (Kalaram Mandir) श्रीरामाची महाआरती केली. 

भगवा कुर्ता, गळ्यात रुद्राक्षांच्या माळा... काळाराम मंदिरात बाळासाहेबांच्या लुकमध्ये उद्धव ठाकरेंनी केली पूजा

Uddhav Thackeray in Kalaram Mandir : उद्धव ठाकरेंनी आज नाशिकच्या काळाराम मंदिरात (Kalaram Mandir) जाऊन सहकुटुंब दर्शन घेतलं. पत्नी रश्मी ठाकरे, पुत्र आदित्य आणि तेजस ठाकरे त्यांच्यासोबत उपस्थित होते. ठाकरे कुटुंबानं वैदिक मंत्रोच्चारात श्रीरामाची पूजा केली... काळाराम मंदिरात ठाकरे कुटुंबानं शिवसेना कार्यकर्त्यांसह काळारामाची आरती देखील केली. यावेळी मंदिर समितीच्या वतीनं उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray) सत्कार करण्यात आला. काळाराम दर्शनानंतर ठाकरे कुटुंब गोदा तीरावर जाऊन महाआरती केली. त्याआधी उद्धव ठाकरेंनी आपल्या नाशिक दौऱ्यात भगूरमधील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाला भेट दिली. यावेळी जिल्हाध्यक्ष विजय करंजरकर यांनी उद्धव ठाकरेंचं स्वागत केलं. त्यांच्यासोबत आदित्य ठाकरेही उपस्थित होते.

 उद्धव ठाकरे यांनी भगवा कुर्ता परिधान केला होता. तसंच गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घातल्या होत्या आणि कपाळावर भगवा टीळा लावला होता. त्यांना पाहिल्यानंतर अनेकांना बाळासाहेबांची (Balasaheb Thackeray) आठवण आली. ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना नाशिकमध्ये उद्धव ठाकरे यांचं जोरदार स्वागत केलं. उद्धव ठाकरे यांना जेसीबीमधून 40 फुटांचा हार घालण्यात आला. तसंच त्यांच्या जेसीबीमधून फुलांची उधळण करण्यात आली.

fallbacks

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मंगळवारी म्हणजे 23 जानेवारीला जयंती आहे. यानिमित्ताने पक्षाचं महाशिबीर आयोजित करण्यात आलं असून संध्याकाळी जाहीर सभा होणार आहे. मंगळवारी सकाळी त्र्यंबक रोडवरच्या हॉटेल डेमोक्रसी इथं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं महाशिबिर होणार आहे. यात राज्यभरातून 1600 प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या शिबिरात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच रणनिती आखली जाईल. 

fallbacks

त्यानंतर मंगळवारी संध्याकाळी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेआधी सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल्यंच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सांगितलं. तसंच यावेळी कारसेवकांचा सत्कार केला जाणार आहे. 

Read More