Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

नवरा रुसला, टॉवरवर जाऊन बसला आणि म्हणाला, 'मी संसार करीन पण....'

हा पहिलाच नवरा असेल जो बायको माहेरी गेल्याने दुखी झालाय, पठ्ठ्याने चक्क नाराज होत टॉवरवर ठिय्या मांडला, आणि म्हणतो..... 

नवरा रुसला, टॉवरवर जाऊन बसला आणि म्हणाला, 'मी संसार करीन पण....'

चेतन कोळस, झी 24 तास येवला : बायकोची कटकट किंवा त्रास कधी संपतो असंही काही जणांना वाटतं. पण बायकोचा धाक आणि प्रेम दोन्ही नाही म्हटलं तरी प्रत्येक पतीला हवं असतं. तिची कटकट वाटली तरी सुद्धा हा वाद टोकाला गेला तर त्याचाही जीव  वरखाली होतो. आता बातमी अशाच एक विरूची आहे. 

भांडण झालं आणि त्याचा राग मनात घेऊन बायको थेट माहेरी निघून गेली. बायको घर सोडून गेल्याने तिचा विरह सहन झाला नाही. राग शांत झाल्यावर नवऱ्याला बायकोची आठवण येऊ लागली. मात्र बायको काही मानायला तयार नाही. 

अखेर बायकोचा विरह सहन न झाल्याने नवऱ्याने चक्कर दारू पिऊन BSNL च्या टॉवरवर चढत शोले स्टाईल आंदोलन करत बायकोने नांदायला यावे अशी मागणी केली.

ही घटना निफाड तालुक्यातील जळगाव फाट्यावर घडली आहे. दिलीप मोरे असे याचे नाव असून तब्बल तीन तास हा ड्रामा चालू होता. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली. 3 तासांच्या अथक प्रयत्नानंतर पोलीस आणि नागरिकांना या विरुला खाली उतरवण्यात यश आले. 

या विरुनं पुन्हा नांदायला ये अशी विनवणी आपली पत्नीला केली आहे. मी दारू नाही पिणार संसार करीन. माझ्या मागण्या मान्य करा पण तिला नांदायला पाठवा असं त्याने पत्नीच्या कुटुंबियांकडे मागणी केली आहे. 

Read More