Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

'झुमका वाली पोर' फेम अभिनेत्यावर बलात्काराचा गुन्हा; गाण्यात काम देऊन केले अत्याचार

Hai Jhumka Wali Actor Vinod kumawat : 'हाय झुमका वाली पोर' या सुप्रसिद्ध गाण्याचा निर्माता आणि अभिनेता विनोद कुमावतवर बलात्काराचा गुन्हा दाखल झालाय. तरुणीने तक्रार दिल्यानंतर नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

'झुमका वाली पोर' फेम अभिनेत्यावर बलात्काराचा गुन्हा; गाण्यात काम देऊन केले अत्याचार

योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : गेल्या काही काळापासून अहिराणी गाण्यांनी तरुणाईला भुरळ पाडली आहे. त्यातीतलच झुमका वाली पोर हे गाणं अनेकांच्या तोंडी ऐकू येत असेल. या गाण्यावर इन्स्टा रिल्स आणि काही व्हिडीओ देखील तयार करण्यात आले आहेत. मात्र आता हे गाणं तयार करणाऱ्या निर्माता विनोद कुमावत विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. झुमका वाली पोर गाण्यामुळे प्रसिद्ध झालेल्या विनोद कुमावत विरोधात गुन्हा दाखल झाल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

दहा लाखांहून अधिक फॉलोवर असलेल्या निर्माते विनोद कुमावत विरोधात नाशिक रोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युट्युबवरील गाण्यात वृत्तंजारा म्हणून काम करण्यास अभिनेत्रीला विवाहाचे आमिष दाखवत तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी विनोद कुमावरत विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गाण्याच्या शूटिंग दरम्यान ओळख वाढवून अत्याचार केल्याची तक्रार एका तरुणीने दिली. विनोदने मारहाण करत लग्नास नकार दिल्याचेही तरुणीने म्हटलं आहे. 2023 पासून विनोद कुमावत अत्याचार करत असल्याचे तक्रारदार महिलेने म्हटलं आहे. सध्या पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

'विनोद कुमावतने लग्नाचे आमिष दाखवून 30 ऑगस्ट 2022 ते 17 जानेवारी 2023 या कालावधीत वेगवेगळ्या ठिकाणी  शारीरिक अत्याचार केले. तसेच पहिल्या लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने शिवीगाळ करून मारहाण करत लग्नास नकार दिला. ओळखीचा गैरफायदा घेत लग्नाचे आमीष दाखवून मागील पाच महिन्यांत वेगवेगळ्या ठिकाणी नेत शारीरिक अत्याचार केला,' असे तक्रारदार तरुणीने म्हटलं आहे.

दरम्यान, विनोद कुमावतने तक्रारदार तरुणीला प्रसिद्ध झुमका वाली पोर या गाण्यांमध्ये नर्तिका म्हणून काम दिले होते. विनोद कुमावतने मला मानधनही दिले नसल्याची तक्रार तरुणीने केली आहे. त्यामुळे आता बॉलीवूडसोबत सोशल मीडियामध्येही महिलांचे आर्थिक शोषण होत असल्याचे समोर आलं आहे.

Read More