Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

स्पीकर ऑन करून बोलताना मोबाइलचा स्फोट; तुम्ही तर ही चूक करत नाहीयेत ना?


Nanded Mobile Phone Blast: नांदेडमध्ये मोबाइल फोनचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

स्पीकर ऑन करून बोलताना मोबाइलचा स्फोट; तुम्ही तर ही चूक करत नाहीयेत ना?
Updated: Jul 05, 2024, 09:44 AM IST

Nanded Mobile Phone Blast: मोबाइल फोन हा आता अविभाज्य घटक झाला आहे. आपण आता छोट्या छोट्या गोष्टींसाठी फोनवर अवलंबून राहावं लागत आहे. मात्र अलीकडे फोनचा अति वापरही आरोग्यासाठी हानिकार ठरत असल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर, फोनमुळं अनेक दुर्घटना झाल्याच्याही घटना घडत आहेत. फोन चार्जिंगला लावल्यामुळं स्फोट झाल्याच्या बातम्या तर तुम्ही ऐकल्या असतीलच. पण मोबाईलवर स्पीकर ऑन करुन बोलत असताना फोनचा स्फोट झाल्याची एक घटना घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. 

मोबाईलवर स्पीकर ऑन करुन बोलताना अचानक मोबाईचा स्फोट होऊन आग लागली. दैव बलवत्तर म्हणून मोबाईलवर बोलणाऱ्या व्यक्तीला या घटनेत कोणतीही इजा झालेली नाही. नांदेड शहरात ही घटना घडली आहे. जुन्या नांदेड शहरात महमद अली रोड भागात अफरा कलेक्शन नावाचे लेडीज एम्पोरियमचे दुकान आहे. दुकानाचे मालक अब्दुल समद हे आपल्या मोबाइल वर स्पीकर ऑन करुन बोलत होते. तितक्यात अचानक मोबाईलचा स्फोट होउन मोबाइलला आग लागली. 

प्रसंगावधान राखत अब्दुल यांनी क्षणात मोबाईल फोन दूर फेकून दिला. त्यामुळं त्यांना कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही. अब्दुल समद यांच्याकडे samsung A22 हा मोबाइल होता. ओव्हर हीटमुळे मोबाईलचा स्फोट झाला असावा असा अंदाज आहे. मात्र वेळीच फोन दूर फेकल्याने मोठा अनर्थ टळला आहे. या प्रकरणामुळं एकच खळबळ उडाली आहे. 

ओव्हरहिटमुळं मोबाईलचा स्फोट, काय काळजी घ्याल?

तासन् तास फोनवर बोलणे, गेम खेळणे, सतत इंटरनेट सुरू ठेवणे, बॅटरीची क्षमता कमी होणे, उन्हात फोन ठेवणे यासारख्या कारणांमुळं मोबाईलचा स्फोट होण्याच्या घटना घडल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर, मोबाईल रात्रभर चार्जिंगला लावल्याने ओव्हरहिट होतो त्यामुळं स्फोट होण्याची शक्यता असते. फोन चार्जिंगला असताना फोनवर बोलू नका. तसंच, चार्जिंग करताना मोबाईलवर व्हिडिओ बघणे व गेम खेळणेदेखील टाळावे.

फोन चार्जिंग होत असताना थोडा गरम होतोच त्यामुळं नेहमी कमी तापमानातच चार्ज करावा. तसंच, फ्रीजवर फोन ठेवून कधीही चार्ज करु नका. उष्णता जास्त असल्यास बॅटरी फुगण्याची शक्यता असते. त्यामुळं चार्जिंग करताना गेम्स खेळू नका. त्याचा परिणाम बॅटरीवर होतो.