Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

भंडारा-गोंदियात पोटनिवडणुकीसाठी भाजप घाबरतंय - नाना पटोले

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघाचे भाजपचे माजी खासदार नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात बंडाचा झेंडा हाती घेऊन भाजपला रामराम ठोकला आणि स्वगृही कॉंग्रेसमध्ये परतले. 

भंडारा-गोंदियात पोटनिवडणुकीसाठी भाजप घाबरतंय - नाना पटोले

भंडारा : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघाचे भाजपचे माजी खासदार नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात बंडाचा झेंडा हाती घेऊन भाजपला रामराम ठोकला आणि स्वगृही कॉंग्रेसमध्ये परतले. 

लोकसभेची पोटनिवडणुक नाही

नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर भंडारा-गोंदिया लोकसभेची जागा रिक्त झाली. देशात बाकी राज्यात लोकसभेच्या जागा रिक्त असताना त्यांच्या सोबतच भंडारा-गोंदिया लोकसभेची पोटनिवडणुक लागेल अशी चिन्ह होती. मात्र, भंडारा-गोंदिया वगळता देशातील इतर राज्यातील पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. 

ही भाजपची खेळी असल्याचा आरोप

दरम्यान, उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात, भंडारा-गोंदिया लोकसभेची पोटनिवडणुक घेण्यास विरोध दर्शविणारी याचिका दाखल करण्यात आल्याने ही पोटनिवडणुक लांबण्याची चिन्हं आहेत. दरम्यान, भाजपची जिल्ह्यात लोकसभेची तयारी नसल्याने भाजपने ही खेळी खेळल्याची आरोप नाना पटोले यांनी केला आहे.

Read More