Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

जायकवाडीला नव्हे बियर फॅक्टरीला पाणी - भाजप आमदार

जायकवाडीसाठी पाणी मागतलं जातं पण त्याआडून बियरच्या फॅक्टरी आणि साखर कारखान्यांना पाणी.

जायकवाडीला नव्हे बियर फॅक्टरीला पाणी - भाजप आमदार

नाशिक : जायकवाडीसाठी पाणी मागतलं जातं पण त्याआडून बियरच्या फॅक्टरी आणि साखर कारखान्यांना पाणी दिलं जातं असा गंभीर आरोप भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी केलाय. या प्रकरणी मुख्य अभियंता कोहिरकर यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी फरांदे यांनी केलीय. सरकारला चुकीची माहिती देत कोहिरकर सरकारची फसवणूक करत असल्याचा आरोपही देवयानी फरांदेंनी केला. गंगापूर, पैठण, नेवासा, शेवगाव या तालुक्यात अनधिकृत पंपांद्वारे पाणीउपसा केला जात असल्याचं त्या म्हणाल्या. 

fallbacks

दरम्यान, जायकवाडीला पाणी सोडण्यास सुरू असलेला विरोध अधिक तीव्र झालाय. नाशिक महापालिकेच्या महासभेत याच विषयावरुन मांडलेल्या लक्षवेधीत चांगलाच गदारोळ झाला. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी जोरदार घोषणाबाजी करत सभात्याग केला. विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी सिंचन भवनावर हल्लाबोल करत, मुख्य अभियंत्यांच्या दालनात निदर्शनं केली. जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता किशोर कुलकर्णी यांच्या दालनात मनपाच्या विरोधीपक्षाच्या नगरसेवकांनी ठिय्या आंदोलन केलं. 

सभागृहात सत्ताधारी भाजपाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला, चर्चा नको कृती हवी अश्या घोषणादेत बाहेर पडले आणि त्यानंतर सभागृहातील विरोधकांनी थेट जलसंपदा कार्यालयाकडे कूच करत मुख्य अभियंता यांच्या कार्यलयात ठिय्या दिला. यावेळी जलसंपदा विभगातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांची चांगलीच धांदळ उडाली. मात्र महासभेत चर्चा काय कामाची जलसंपदा मंत्री असतांना त्यांच्या भोवती पिंगा घालणारे आमदार काय करताय असा खडा सवाल शिवसेनेने केलाय.तर विरोधी पक्ष म्हणून आम्ही सक्षम आहोत न्यायलयीन लढाई चालू आहे, रस्त्यावरची लढाई देखीळ चालू राहील अशी भूमिका विरोधी पक्षांनी बजावलीय. 

Read More