Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

नागपुरात बिअर बारमध्ये तरुणाची हत्या

नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा इथे गोळी झाडून एका तरूणाची हत्या करण्यात आलीय.

नागपुरात बिअर बारमध्ये तरुणाची हत्या

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा इथे गोळी झाडून एका तरूणाची हत्या करण्यात आलीय.

राजबाबा बिअर बारमध्ये हा प्रकार घडला आहे. आकाश पानपत्ते असं मृत तरूणाचं नाव आहे. आकाशच्या डोक्यात गोळी झाडून आरोपीने तिथून पळ काढला.

आकाशवर तीन गोळ्या झाडण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. आकाशला जवळच असलेल्या पवार हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. त्यानंतर तिथून त्याला अॅलेक्सिस हॉस्पिटलमध्ये नेण्यात येतानाचा त्याचा मृत्यू झाला. 

आकाशची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे. जुन्या वैमनस्यातून त्याची हत्या करण्यात आल्याची शक्यता वर्तवली जातेय.

बिअर बारमध्ये तरुणाची हत्या

Read More