Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

नागपूरमध्ये बंदुकीच्या धाकाने बलात्कार

नागपूर ही क्राईम कॅपिटल होण्यासाठी आजवर गुंड टोळ्याच कारणीभूत आहेत असं दिसत होतं.

नागपूरमध्ये बंदुकीच्या धाकाने बलात्कार

नागपूर : नागपूर ही क्राईम कॅपिटल होण्यासाठी आजवर गुंड टोळ्याच कारणीभूत आहेत असं दिसत होतं. पण आता पोलीसही गुंडांच्या पावलावर पाऊल ठेवायला लागल्यात की काय असा प्रश्न पडतोय. 

रवी जाधव नावाच्या पोलिसाकडून बलात्कार

नागपूर पोलीस मुख्यालयात कामाला असलेल्या रवी जाधव नावाच्या पोलिसाने एका महिलेवर बंदुकीचा धाव दाखवून बलात्कार केला. एका बिल्डरकडे रवी जाधवची सुरक्षा रक्षक म्हणून नियुक्ती झाली होती. 

बंदुकीच्या धाकाने बलात्कार

शनिवारी पीडित महिला तिच्या लहान मुलीसह एकटीच घरी होती. तिचा पती बाहेर गेल्याचं पाहून रवी जाधव घरात घुसला आणि त्याने पीडितेवर जबरदस्ती करायला सुरूवात केली. महिलेने विरोध केल्यावर लहान मुलीला गोळी घालण्याची धमकी त्याने दिली. अखेर हतबल झालेल्या पीडित महिलेवर त्याने बलात्कार केला. 

Read More