Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

बंद ग्रंथालयांसाठी 75 लाखांचं सॅनिटायझर? नागपूर महापालिकेत सॅनिटायझर घोटाळा?

सॅनिटायझरनं कुणाची 'हातसफाई' ? नागपूर महापालिकेत सॅनिटायझर घोटाळा? 

बंद ग्रंथालयांसाठी 75 लाखांचं सॅनिटायझर? नागपूर महापालिकेत सॅनिटायझर घोटाळा?

अमर काणे, झी 24 तास, नागपूर : नागपूर महापालिकेच्या स्टेशनरी घोटाळ्याची चौकशी सुरु असताना शिक्षण, ग्रंथालय विभागाचा आणखी एक घोटाळा समोर आला आहे. बंद असलेल्या ग्रंथालयासाठी सॅनिटायझरवर तब्बल 75 लाख रूपये खर्च झाल्याचं उघड झालं आहे. 

नागपूर महापालिकेतील स्टेशनरी घोटाळ्यात अनेक धक्कादायक माहिती पुढे आली आहे. घोटाळ्यांच्या या मालिकेत आता नवी कडी जोडली गेली आहे. 

कोरोनाकाळात लॉकडाऊनमध्ये ग्रंथालय बंद असताना विभागानं तब्बल 75 लाखांचं सॅनिटायर वापरल्याचं देयक दाखवलं. ग्रंथालय बंद होते तर मग हे सॅनिटायझर कुणी वापरलं, असा सवाल यानिमित्तानं उपस्थित होतो.  

सॅनिटायझर खरेदीची बोगस बिलं सादर करण्यात आली आहेत. हा घोटाळा केवळ सॅनिटायझरपुरता मर्यादित नाही. स्टेशनरी विभागात अशाच प्रकारे बरीच बेकायदेशीर बिलवसुली झाल्याची चर्चा आहे. आता कोरोना संकटात कुणा कुणाची चांदी झाली हे लवकरच स्पष्ट होईल. 

Read More