Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

धक्कादायक! शरीर खाणारी काळी बुरशी, पोस्ट कोविड मोठ्या आतडीला म्युकरचा संसर्ग

काळ्या बुरशी ठरतेय आणखी जीवघेणी 

धक्कादायक! शरीर खाणारी काळी बुरशी, पोस्ट कोविड मोठ्या आतडीला म्युकरचा संसर्ग

अमर काणे, झी मीडिया, नागपूर : कोविड बरा झाल्यानंतर काही रुग्णांना  म्युकोर मायकॉसिस या काळ्या बुरशीनं होणा-या आजारानं ग्रासल आहे. यामध्ये म्युकरनं अनेकांचा जीवही घेतला.जबडा,नाक,डोळे व डोक्यापर्यंत दिसणारी ही काळी बुरशी शरिरातील इतर भागात अवयंवांवर संसर्ग होताना दिसत आहे. नागपुरातील एका रुग्णाच्या मोठी आतडी (LARGE INTESTIENE)मध्ये म्युकोर मायकोसिस झाल्याच आढळून आलं आहे.

पोस्ट कोविड म्युकोर झालेला हा रुग्ण 78 वर्षीय आहे.नागपूरच्या सेव्हनस्टार रुग्णलयात त्याच्यावर उपचार सुरु आहे. कोविडनंतर या रुग्णाला जून महिन्यात म्युकोरचा त्रास झाला. त्यात त्यांचा डावा डोळा निकामी झाला. पण त्यानंतर सुद्धा संसर्ग हा शरीरातून नष्ट झाला नाही. पोटात दुखत असल्याने लॅप्रोस्कोपीक आणि एंडोस्कोपी तज्ज्ञ प्रशांत राहाटे यांच्याकडे त्याचे उपचार सुरु झाले. त्यावेळी धक्कादायक वास्तव समोर आलं. 

रूग्णाच्या मोठ्या आत़डीमध्ये म्युकोरचा झाला होता.यामुळेच पोट दुखत असल्याचे निदान झाले. त्याच्यावर उपचार करत डॉ. प्रशांत राहाटे यांनी तो म्युकोरची लागण झालेला तो भाग काढला. सध्या या रुग्णावर अजून उपचार सुरु आहे. हा पोटाच्या आतड्यासह पाय, इतर अवयावावर हा काळ्या बुरशीचा संसर्ग झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यात आले आहे. यामुळे नक्कीच ही बाब चिंता वाढवणारी आहे.

म्युकोरबद्दल बोलताना डॉ प्रशांत रहाटे म्हणाले,' की मी गेल्या 30 वर्षांपासून प्रक्टिस करतोय. कोविडपूर्वी दोन वर्षात एखादा म्युकोरचा  रुग्ण आढळून येत. मात्र पोस्ट कोविडमध्ये म्युकोरच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. फुफुसामध्ये म्युकोरचे बॉल्स तयार होऊन हा पोखरून काढत असल्याचेही रुग्ण आले. एका रुग्णाला असून हत्तीरोग झालेल्या पायात सुद्धा म्युकर मिळून आला. यासोबत एक रुग्ण हा मूळव्याध (पाईल्स)च्या शस्त्रक्रियेनंतर सुद्धा काळ्या बुरशीची लागण झाली असल्याचे निदर्शनात आल्याचं ते सांगतात. नागपूर जिल्ह्यात पोस्ट कोविड म्युकोरचे रुग्ण मोठ्याप्रमाणात आढळले आहे. 1718 रुग्णांना म्युकोर झाला तर यामध्ये  175 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Read More