Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

दाऊद, मन्याच्या आवळल्या मुसक्या, याकूब मात्र फरार

धुडगूस घालणाऱ्या दाऊद आणि मन्याला जेरबंद करता करता वाट लागली

दाऊद, मन्याच्या आवळल्या मुसक्या, याकूब मात्र फरार

अमर काणे, झी २४ तास, नागपूर : नागपूरमध्ये धुडगूस घालणारे दाऊद आणि मन्याला जेरबंद करण्यात आलंय. याकूब मात्र फरार आहे. नागपूरमध्ये धुडगूस घालणाऱ्या या डुरक्याला नाट्यमयरित्या पकडलं.गेले दहा-पंधरा दिवस नागपूरमध्ये धुडगूस घालणाऱ्या दाऊद आणि मन्याला जेरबंद करता करता वाट लागली. दाऊद, मन्या आणि याकूबनं एवढा हैदोस घातला की अनेक गाड्यांचं नुकसान झालं.. वळूंचा हैदोस झी २४ तासनं दाखवला तेव्हा कुठे महापालिकेला जाग आली.

मात्र दाऊद, मन्या, याकूबला आवरणं म्हणजे मोठी डोकेदुखी होती पण एका बेसावध क्षणी सावज गावलंच. संध्याकाळी साडे सातच्या सुमाराला दाऊद सुभाषनगरमधल्या मैदानात गाईंच्य़ा कळपात जाऊन बसला होता. मैदानाची सगळी गेटस बंद करण्यात आली. 

सात जणांची टीम दाऊदला पकडण्यासाठी सापळा, फास घेवून मैदानात घुसली... मोठ्या शिताफीनं त्याला पकडलं आणि एका खांबाला बांधलं. दहा पंधरा मिनिटं डुरक्यानं ढुशा दिल्या. पण अखेर दाऊदनं हार मानली. 

मन्याला आदल्या रात्रीच जेरबंद करण्यात आलं होतं. याकूब मात्र अजूनही मोकाट आहे. दाऊदला पकडून गाडीत टाकून घेऊन जात असताना त्याचा साथीदार याकूबही दिसला. पण दाऊदला गाडीत सोडून याकूबला पकडणं शक्य नव्हतं. दाऊद आणि मन्याची सद्दी संपली. आता मिशन याकूब सुरू होणार आहे  

व्हिडीओ जर्नलिस्ट : रत्नशील 

Read More