Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

ऑगस्ट महिन्यात भरपूर सुट्ट्या, मग 'या' मुंबई जवळच्या ठिकाणांना द्या भेट

ऑगस्ट महिन्यात भरपूर सुट्ट्या आहेत. जर तुम्ही देखील या सुट्ट्यांमध्ये कुठे जाण्याचा विचार करत असाल तर ही आहेत मुंबईपासून सर्वात जवळची सुंदर ठिकाणे. 

ऑगस्ट महिन्यात भरपूर सुट्ट्या, मग 'या' मुंबई जवळच्या ठिकाणांना द्या भेट

ऑगस्ट महिन्यात भरपूर सुट्ट्या आहेत. या सुट्ट्यांमध्ये तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत बाहेर जाण्याचा विचार करत असाल तर ही बातची तुमच्यासाठी आहे. या महिन्यात तुम्हाला 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिनाची सुट्टी असणार आहे. त्यानंतर 17 आणि 18 तारखेला तुम्हाला शनिवार आणि रविवारची सुट्टी असणार आहे. तर 19 तारखेला तुम्हाला रक्षाबंधनाची सुट्टी असेल. तुम्हाला 16 ऑगस्टच्या दिवशी एक सुट्टी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे तुम्हाला 5 दिवस सलग सुट्टी मिळणार आहे. 

लोणावळा

जर तुम्ही मुंबईपासून जवळ जाण्याचा विचार करत असाल तर लोणावळा हे एक खास ठिकाण आहे. प्रसन्न करणारे सौंदर्य आणि पावसाळ्यातील सुंदर नजारा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पुणे, मुंबईमधील लोक येथे येत असतात. थोड्याशा शांततेसाठी लोणावळा हे ठिकाण योग्य आहे. 

खंडाळा

खंडाळा हे ठिकाण निसर्ग प्रेमींसाठी एक सुंदर ठिकाण आहे. खंडाळ्याचे विलोभनीय सौंदर्य हे मुंबई आणि पुण्यातील पर्यटकांना आकर्षित करत असते. येथील राजमाची किल्ला, भुशी तलाव, वलवण धरण आणि शूटिंग पॉइंट  ही फिरण्यासाठी सुंदर ठिकाणे आहेत. मुंबईपासून खंडाळा हे 82 किलोमीटरवर आहे. 

महाबळेश्वर

महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील ठंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. मुंबईजवळ भेट देण्याच्या सर्वोत्तम ठिकाणांमध्ये महाबळेश्वर मोडते. महाबळेश्वर हे स्ट्रॉबेरी, तुती, गूजबेरी आणि रास्पबेरी यांसारख्या उत्पादनासाठी ओळखले जाते. 

माथेरान

माथेरान हे मुंबईजवळ भेट देण्याच्या सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. या ठिकाणी तुम्ही कुटुंबासोबत किंवा जोडीदारासोबत जावू शकतो. माथेरानचे निसर्गरम्य सौंदर्य हे नेहमी पर्यटकांना आकर्षित करत असते. माथेरान हे मुंबईपासून 80 किलोमीटर अंतरावर आहे. 

Read More