Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

कृतज्ञता व्यक्त करत मुस्लिम जोडप्याने मुलीचे नाव ठेवलं 'महालक्ष्मी', कारण वाचून तुम्हीही कराल कौतुक

Mumbai News: मुस्लिम कुटुंबीयांनी त्यांच्या मुलीचे नाव महालक्ष्मी ठेवलं. आणि त्यामागचं कारणही स्पष्ट केले आहे. 

कृतज्ञता व्यक्त करत मुस्लिम जोडप्याने मुलीचे नाव ठेवलं 'महालक्ष्मी', कारण वाचून तुम्हीही कराल कौतुक

Mumbai News: मीरा रोड येथील 31 वर्षीय महिला फातिमा खातून यांनी त्यांच्या नवजात मुलीचे नाव महालक्ष्मी ठेवलं आहे. मुस्लिम असूनही हिंदू देवीचे नाव मुलीला ठेवल्याने या दाम्पत्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. फातिमा खातून यांनी यामागचं कारण देखील सांगितलं आहे. मुलीचं नाव महालक्ष्मी का ठेवलं यामागची गोष्ट त्यांनी सांगितली आहे. 

फातिमा खातून यांनी 6 जून रोजी मुलीला जन्म दिला. जेव्हा त्यांना प्रसूती कळा येऊ लागल्या तेव्हा त्या कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेसने प्रवास करत होत्या. ट्रेनने लोणावळा स्थानक मागे टाकताच त्यांना प्रसूती वेदना सुरू झाल्या. त्यानंतर ट्रेनमध्ये असलेल्या नागरिकांनीच त्यांनी प्रसूती केली. फातिमा आणि त्यांचे पती तैयब यांना ट्रेनचा हा प्रवास नेहमी अविस्मरणीय राहिलं. फातिमा आणि तैयब म्हणतात की, ट्रेनमध्ये असलेल्या प्रवाशांनी त्यांच्या मुलीला पाहिलं तेव्हा त्यांनी ती देवीस्वरुप वाटली त्यामुळं त्यांनी तिचं नाव महालक्ष्मी ठेवलं.

फातिमा आणि तैयब यांना आधी तीन मुलं आहेत. त्यानंतर पुन्हा एकदा फातिमाला दिवस गेले. डॉक्टरांनी डिलिव्हरीची तारीख 20 जून दिली होती. तैयबचे कुटुंब मुंबई येथे राहतात. त्यामुळं ते लोक कोल्हापूरवरुन मुंबईला डिलिव्हरीसाठी जात होते. 6 जून रोजी त्यांनी कोल्हापुर ते मुंबईपर्यंतच ट्रेनचे तिकिट बुक केले होते. मात्र, ट्रेनचे इंजिन फेल झाल्यामुळं ट्रेन लोणावळा येथे दोन तासांपेक्षा जास्त वेळ थांबली होती. जेव्हा 11 वाजण्याच्या सुमारास ट्रेनच्या इंजिनमध्ये बिघाड झाला. त्याचवेळी फातिमाला पोटदुखी सुरू झाली त्यामुळं ती शौचालयात गेली. खूप वेळ झाला तरी ती आली नव्हती म्हणून मी तिला बघायला गेलो होते. तेव्हा कळलं की तिने एका मुलीला जन्म दिला. महिला प्रवाशांनी त्यावेळी आमची मदत केली. 

ट्रेनमधील जीआरपीच्या एका कॉन्स्टेबलने तैयब यांना जीआरपी हेल्पलाइनला फोन करण्यास सांगितले तसंच, त्यांना सर्व परिस्थितीबद्दल सांगितले. जेव्हा ट्रेन कर्जत स्थानकात पोहोचली तेव्हा तैयब आणि फातिमा ट्रेनमधून उतरले. कर्जत जीआरपीचे एपीआय मुकेश ढांगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही कर्जत उप-जिल्हा रुग्णालयाला सूचना दिली तेव्हा नर्स शिवांगी साळुंखे आणि कर्मचारी स्थानकात पोहोचले. महिला आणि मुलीला पुढील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

रुग्णालयातील सहाय्यक मॅट्रन सविता पाटील यांनी म्हटलं की, तीन दिवसांच्या उपचारांनंतर आई व मुलीला रुग्णालयातून सुटी देण्यात आली. दोघही पूर्णपणे स्वस्थ आहेत. तैयब आणि फातिमा ट्रेनमध्ये होते तेव्हा तिरुपती ते कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराची प्रवास करुन आलेल्या काही सह प्रवाशांनी मुलीला पाहिलं. त्यांनी म्हटलं की माझ्या मुलीची जन्म देवीचे दर्शन करण्यासारखाच आहे. त्यामुळं मी तिचं नाव महालक्ष्मी ठेवण्याचा निर्णय घेतला. 

Read More