Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

फेब्रुवारी महिन्यात राज्यात निवडणुकीचा बार उडण्याची शक्यता

राजकीय वर्तुळातली महत्त्वाची बातमी येत आहे.

फेब्रुवारी महिन्यात राज्यात निवडणुकीचा बार उडण्याची शक्यता

दीपक भातुसे, मुंबई : राजकीय वर्तुळातली महत्त्वाची बातमी येत आहे. फेब्रुवारी महिन्यात राज्यात निवडणुकीचा बार उडण्याची शक्यता आहे. 5 महापालिकांसह तब्बल 96 नगरपालिकांसाठी फेब्रुवारीत निवडणुका होऊ शकतात. कोरोनामुळे पुढे ढकललेल्या नवी मुंबई, औरंगाबाद, वसई-विरार महापालिकेसाठी फेब्रुवारी महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे. 

नोव्हेंबरमध्ये मुदत संपलेल्या कल्याण-डोंबिवली आणि कोल्हापूर महापालिकेसाठीही याच कालावधीत निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर मुदत संपलेल्या आणि लवकरच मुदत संपणाऱ्या 96 नगरपालिकांच्या निवडणुकाही याच काळात होण्याची चिन्हं आहेत.

काही महिन्यांपूर्वीच बिहार विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि निकालही लागला. त्यामुळे आता राज्यातील निवडणुका घेण्याचे नियोजन करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी मतदार यादीत नाव नोंदणी करण्याचं काम सुरु आहे. त्यामुळे लवकरच राज्यात निवडणुकांचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे.

महाविकासआघाडी सरकार राज्यात स्थापन झाल्यानंतर महापालिका निवडणुकांबाबत ही उत्सूकता आहे. त्यामुळे आता महाविकासआघाडी मधील पक्ष एकत्र लढणार का याकडे लक्ष लागलं आहे.

Read More