Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी : मुंबई-सिंधुदुर्ग प्रवास अवघ्या ४५ मिनिटांत

चाकरमान्यांसाठी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिलासादायक बातमी दिलीयं.

कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी : मुंबई-सिंधुदुर्ग प्रवास अवघ्या ४५ मिनिटांत

विकास गावकर, झी मीडिया, सिंधुदुर्ग : जून गेला... जुलैसुद्धा सरला... तरीही सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचा शुभारंभ काही झाला नाही. गावाची ओढ चाकरमान्यांना अस्वस्थ करते. गणेशोत्सवासाठी कोकणात जायचं स्वप्न घेऊन चाकरमानी वर्षभर जगत असतो. दरवर्षी मुंबईपासून कोकणपर्यंतचा खड्डेमय रस्त्यातला प्रवास चाकरमान्यांना हैराण करतो. कोकण रेल्वे आहे तीही नावापुरतीच अशी काही ती चाकरमान्यांची अवस्था... त्यामुळे चिपी विमानतळाच्या बातमीनं विघ्नहर्ता पावलाच अशी चाकरमान्यांची अवस्था झाली होती. अद्यापही हे चिपी विमानतळ सुरु न झाल्याने चाकरमानी हताश झाले. मात्र चाकरमान्यांसाठी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिलासादायक बातमी दिलीयं.

कोकणच्या विकासाचा चेहरा 

विमानानं अवघ्या ४५ मिनिटांचा प्रवास म्हणजे मुंबईतून वरच्या आवाजात भजनाला सुरुवात करायची आणि भजन संपण्याआधीच गावात पोहचायचं असा सुखद अनुभव चाकरमान्यांना लाभणार आहे. चिपी विमानतळ म्हणजे कोकणच्या विकासाचा चेहरा बदलणारं साधन ठरावं.. मुंबई-गोवा महामार्गाचं सुरु असलेलं काम आणि अरुंद रस्ते, वडखळ नाक्यावरील वाहनांच्या लांबच लांब रांगा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेळेचा अपव्यय. या सगळ्याला चिपी विमानतळ हे उत्तर ठरणार आहे. त्यामुळे हे विमानतळ गणेशोत्सवाआधी सुरु व्हावं असंच गाऱ्हाणं चाकरमानी घालत असणार. 

Read More