Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

Navneet Rana : नवनीत राणा यांना कोणत्याही क्षणी अटक?, कोर्टाचे पोलिसांना निर्देश

 Mumbai News  Sewri court issues arrest warrant against Navneet Rana  : अपक्ष खासदार नवनीत राणा ( Navneet Rana) यांच्या अडचणी वाढ झाली आहे. त्यांच्याविरोधात तात्काळ अटक वॉरंट जारी करण्याचे निर्देश शिवडी न्यायालयाने मुलुंड पोलिसांना दिले आहेत.  

Navneet Rana : नवनीत राणा यांना कोणत्याही क्षणी अटक?, कोर्टाचे पोलिसांना निर्देश

अनिरुद्ध दवाळे, अमरावती : Sewri court issues arrest warrant against  MP Navneet Rana  : अपक्ष खासदार नवनीत राणा ( Navneet Rana) यांच्या अडचणी वाढ झाली आहे. त्यांच्याविरोधात तात्काळ अटक वॉरंट जारी करण्याचे निर्देश शिवडी न्यायालयाने मुलुंड पोलिसांना दिले आहेत. यापूर्वी देखील शिवडी न्यायालयाने जामीन पात्र वॉरंट जारी केले होते. या विरोधात सत्र न्यायालयात राणा यांनी धाव घेतली होती. मात्र न्यायालयात कुठल्याही प्रकारच्या वॉरंटला स्थगिती मिळाली नव्हती. त्यामुळे कारवाई करण्याचे निर्देश शिवडी न्यायालयाने दिले आहेत.( MP Navneet Rana Will be arrested at any moment? Sewri Court's Instructions to Mulund Police)

शिवडी न्यायालयाच्या या आदेशामुळे अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने नवनीत राणा यांच्या विरोधात पोलिसांना तत्काल अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याचे निर्देश दिले आहेत. तात्काळ वॉरंट जारी करण्याचे शिवडी न्यायालयाने निर्देश दिलेत.  यापूर्वी देखील शिवडी न्यायालयाने जामीन पात्र वॉरंट जारी केले होते. 

दम्यान, यासंदर्भातील याचिकेवर 7 नोव्हेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे. त्यामुळे खासदार नवनीत राणा आणि त्यांचे वडील यांच्यावर अटकेची टांगती तलवार असल्याचे पाहायला मिळत आहे. जात पडताळणी प्रकरणांमध्ये मुलुंड पोलिसांनी जामीन पात्र वॉरंटला आणखी मुदत द्यावी, याकरिता शिवडी न्यायालयामध्ये अर्ज केला होता. मात्र या अर्जावर याचिकाकर्ते यांनी आक्षेप घेतला. त्यांनी म्हटले की, सत्र न्यायालयाने कुठलेही संरक्षण तथा अद्याप निर्णय दिलेला नाही. आजदेखील पोलिसांनी अद्यापही कारवाई केलेली नाही, असे कोर्टाच्या समोर निदर्शनास आणून दिले. त्यानंतर शिवडी न्यायालयाच्या न्यायाधीशांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ अजामीनपात्र वॉरंट काढून तातडीने कारवाई करण्यात यावी, असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे खासदार नवनीत राणा यांना मुलुंड पोलीस कोणत्याही क्षणी अटक करण्याची शक्यता आहे.

Read More